नमस्कार मित्रांनो.
सर्व स्वामी भक्तांना मनापासून नमस्कार भक्तहो आज मी तुम्हाला असा एक जबरदस्त भयानक अनुभव सांगणार आहे की हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल डोळ्यात अश्रू देखील येतील. आपले स्वामी आपल्या भक्तांच्या कसे पदोपदी सोबत असतात या आजच्या लेखामध्ये तुम्हाला लक्षात येईल. स्वामीभक्त हो हा अनुभव मिरज येथील आहे. ते दादा सांगतात २०१४ साली जेस्ट बीकॉम मध्ये प्रवेश घेतला होता.
त्याच्या बाबांना कॅन्सर झाला होता. सुदैवाने आणि स्वामी कृपेमुळे ते वाचले. त्या गोष्टीला एक वर्ष होत नाही तोपर्यंत त्यांना हार्ट अटॅक आला. हो एवढा जोरदार होता की त्यांना ताबडतोब बेचाळीस हजार रुपये चे इंजेक्शन द्यावे लागले. त्यातूनही ते बाहेर आले. पण डिस्चार्ज देताना दहा पावल पण चलता येत नव्हते. डॉक्टरांनी एंजॉग्रफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही बेळगाव येथे घेऊन जायचे ठरवले.
मी खूप लहान आणि दोन दोन महिने कोणीही पाहुणे सोबत नव्हते. वीस हजार रुपये घेऊन मी बेळगावला गेलो रेल्वेमध्ये बसलो आणि स्वामींना म्हणालो तुम्ही पाठीशी असाल तर ऑपरेशन होऊ देऊ नका. डॉक्टर माधव दीक्षित म्हणून डॉक्टर होते. ऑपरेशन करायच ठरल खर्च सांगितला पैसे भरले मिरज मधून मित्रांना घेऊन ब्लड दिलआणि मला भीती वाटत होती म्हणून मी भाऊजींना थांबून मिरजेला आलो.
दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झाली बाबांना आत ऑपरेशनला घेतल सर्व मशीन लावली आणि डॉक्टरांनी एंजॉग्रफी केलेली सीडी पाहिली व त्यांनी ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला. मी आमच्या रिस्कवर करण्यास बोललो पण डॉक्टर म्हणाले मी ४० वर्षाचा अनुभव सांगतो मी या माणसाला आणल तर माणूस जागेवर मरणार आहे. मी हसत खेळत माणसाला मारणार नाही.
नंतर मला माझ्या भाऊजींचा फोन आला असे असे झाले आहे. म्हणून मी रडायला लागलो. पैसे नसताना पैसे भरून कसे कॅन्सल झाल. मग स्वामी समोर रडू लागलो. तुम्हीच केल का म्हणू लागलो. एवढ्यात स्वामी फोटोवरून फुल पडल आणि सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर बाबांनी सहा महिने औषध घेऊन पण स्वामी आशीर्वाद पाठीशी त्यामुळे सहा वर्षे अगदी ठणठणीत आहेत. रोज काम करतात. स्वामी सेवा करतात. श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.