Skip to content

अधिक अमावस्या व श्रावण संयोग येथे लावा ५ दिवे. माता लक्ष्मी होईल प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो.

१५ आणि १६ ऑगस्टला आहे अधिक महिन्यातील श्रावण अमावस्या तर मोठा योगायोग जुळून येत असल्याने हा दिवस खूप खास आहे. अधिक महिन्याचा शेवट आणि त्या नंतर श्रावण महिन्याची सुरुवात या दिवशी होत असल्याने हा दिवस धार्मिक दृष्टीकोनातून खास मानला जात आहे.

म्हणूनच अधिक अमावस्या आणि श्रावण संयोगाच्या या दिवशी तुम्ही पाच दिव्याचा हा उपाय नक्की करून पहा शकता. चला तर या उपाय संदर्भात माहिती सविस्तर जाणून घेऊयात. तर अधिक श्रावण अमावस्याच्या दिवशी अधिक महिना संपणार असल्याने आणि श्रावण महिना सुरु होत असल्याने या दिवशी तयार होत असलेल्या ३३ कोटी देवतेचा वास पृथ्वीवर राहतो अस म्हणतात आणि या सर्व ३३ कोटी देवताना प्रसन्न करण्यासाठी या दिवसाच अधिकच महत्व आहे.

ज्यामुळे माणसाची पाप सुद्धा नष्ट होऊन कुटुंबात सुख समूद्धी आणि आनंद येण्यास मदत मिळते. तर या शुभ प्रसंगी देवे प्रज्वलीत केले जातात. दिवा लावल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते. या बरोबरच सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात.

त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा अधिक श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अधिक महिन्यातील अमावस्येला पाच प्रकारचे दिवे लावून ३३ कोटी देवतांची आशीर्वाद प्राप्त करू शकता.या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा, चमेलीच्या तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा लावला जातो.

त्याचवेळी दिवे देखील मातीचे,पिठाचे किंवा पितळी, तांबे,धातूचे दिवे लावले जातात. एवढच नाही तर वेगवेगळ्या देवताच्या पूजेमध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारांचे दिवे लावले जातात. मात्र वेगवेगळ्या पूजेसाठी वेगवेगळ्या दिवे लावणे जर शक्य नसेल तर फक्त पाच प्रकारचे दिवे लावून सर्व देवताना तुम्ही प्रसन्न करू शकता. तर शनि देवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.

त्याचप्रमाणे हनुमंताच्या पूजेसाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावला जातो. तर आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गाईच्या तुपाचा दिवा लावला जातो. तर तुम्ही सुद्धा मोहरीच्या तेलाचा किंवा चमेलीचा तेलाचा दिवा लावून किंवा तुपाच्या तेलाचा दिवा तयार करू शकता. पूजा करताना वेगवेगळ्या तेलाचे तयार करून त्यात ११ अक्षता आणि हळदीकुंकू अर्पण कराव आणि देवघरात आणि घराच्या पाच दिशेला हे दिवे लावावे.

त्यात घराचा मुख्य दरवाजा स्वयंपाक घर घराचा ईशान्य कोपरा तुळस आणि देवघर अशा पाच दिशेला देवे ठेऊन पूजा करावी. संध्याकाळी दिवा लावण खूप शुभ मानल जात. आई लक्ष्मीच्या आगमनाची ही वेळ असते.संध्याकाळी दिवे लावण्याची शुभ वेळ ही ६ ते ८ परेंतची असते. या दरम्यान मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा.

यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी नादते. अशा घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि घरात सकारात्मक राहते. घराच्या मुख्य दारावर दिवा अशा प्रकारे लावावा की तुम्ही बाहेर पडताना तो दिवा तुमच्या उजव्या हाताला असावा.

याबरोबरच दिल्याचे प्रकाशाची दिशा उत्तर किंवा पूर्व असावी. पश्चिमेकडे तोंड करून कधीही दिवा लावू नये.शिवाय तुळशीला लक्ष्मीला रूप मानल जात. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ हा दिवा लावला. तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णू याची कृपा बरसते.

घराच्या ईशान्य दिशेला देवांचा वास असतो म्हणून ईशान्य दिशेला एक दिवा प्रज्वलित करावा. शिवाय स्वयंपाक घरात माता अन्नपुरण्याचा वास असतो म्हणून इथे एक दिवा लावावा. त्यामुळे अन्नाचा साठा कधीही कमी पडत नाही आणि घराची भरभराट होते. तर अशा प्रकारे हे पाच प्रकारचे दिवे लावावे. ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. आणि तुम्हालाही ३३ कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *