Skip to content

अधिक महिन्यात कुलदेवी साठी काय करावे, अशी करा कुलदेवी मातेची सेवा, पुजा..

नमस्कार मित्रांनो.

अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यांमध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून घडायला हवी. कारण कुलदेवताच असते जी आपल्या कुटुंबाच रक्षण करत असते. आपल्यावर येणारे प्रत्येक संकट वरच्यावर झेलून धरत असते. आणि म्हणूनच तिची जर नियमित सेवा आपल्याकडून होत असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सगळ्यांना लाभतो.

तर ही कुलदेवतेची सेवा अधिक महिन्यांमध्ये कशी करावी चला जाणून घेऊया. मित्रांनो प्रत्येक घराची एक कुलदेवता असते. त्या कुलदेवतेचे वर्षातनं एकदा तरी आपण दर्शन घ्यावं. कुलदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. आपल्या कुटुंबात आपल्या कुळावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून कुलदेवताच आपल्याला बाहेर काढत असते. पण त्यासाठी आपल्याकडून कुलदेवतेची व्यवस्थित सेवा मात्र व्हायला हवी.

कुलदेवतेची सेवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. नवरात्रात सुद्धा आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो. तिची सेवा करतच असतो. पण नवरात्र व्यतिरिक्त सुद्धा इतर काही दिवसांमध्ये सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा करायला हवी. अधिक महिना सुद्धा असाच पवित्र महिना आहे.

हा साधनेचा उपासनेचा महिना आहे या महिन्यांमध्ये जशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची अर्थात पांडुरंगाची सेवा करतो. तशीच आपण कुलदेवतेची सेवा सुद्धा करावी.
अधिक महिन्यांमध्ये कुलदेवतेची सेवा करण्याचा एक मुख्य कारण म्हणजे अधिक महिन्यांमध्ये आपण जी काही सेवा करतो जी काही साधना करतो जी काही उपासना करतो त्याचं फळ आपल्याला दस पटीने अधिक मिळत असत.

म्हणून अधिक महिन्यांमध्ये आवर्जून कुलदेवतेची सेवा करावी. मग ही सेवा कशी करावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यातल्या सगळ्या मंगळवारी किंवा सगळ्या शुक्रवारी जस तुम्हाला जमेल तसं कुलदेवतेची ओटी भरावी. म्हणजे जर तुम्ही शुक्रवार निवडला असेल तर सगळ्या शुक्रवारी कुलदेवतेची ओटी भरावी. किंवा मंगळवार निवडला असेल तर प्रत्येक मंगळवारी कुलदेवतेची ओटी भरावी.

जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी जमणार नसेल तर कमीत कमी अधिक महिन्यांमध्ये एका मंगळवारी किंवा एका शुक्रवारी तरी कुलदेवतेची ओटी भरायला विसरू नये. ओटीमध्ये कुलदैवतला साडी चोळी बांगड्या मनी मंगळसूत्र जोडवे हळदीकुंकू त्याचबरोबर हार किंवा वेणी पाच प्रकारची फळ नारळ त्याचबरोबर दक्षिणा विडा हे सगळं भक्ती भावाने अर्पण कराव.

जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तर आई जगदंबे जवळ तुमची समस्या सांगावी. ती आपली आई आहे आपल्या हाकेला नक्कीच धावून येते. अधिक महिन्यांमध्ये कुलदेवतेची जी सेवा करायची त्याच्यात ओटी भरण हा एक भाग झाला.
पण या व्यतिरिक्त तुम्ही कुलदेवतेच्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता.

मंगळवार निवडा किंवा शुक्रवार निवडा अधिक महिन्यामधला आणि तुमच्या कुलदेवतेचा जप करा. किंवा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकता. स्तोत्र कोणते म्हणायचे श्रीसूक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात किंवा देवी महात्मे वाचू शकतात. यापैकी कुठलाही स्तोत्र निवडा आणि अधिक महिन्यातल्या शुक्रवारी किंवा मंगळवारी नित्यनेमाने म्हणा लक्षात ठेवा.

लक्षात ठेवा कुलदेवतेची जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण तिला हाक मारतात ती आपल्या मदतीला धावून येते. आपल्याला मनःशांती मिळते. आपल्या कुटुंबातली आजारपण दूर होतात. आपल्या कुटुंबात आर्थिक चणचण असेल तर ती दूर होते. कुलदेवता आपली सगळ्या बाजूने रक्षा करते.

आता इथे अनेकांचा प्रश्न असेल आम्हाला आमची कुलदेवताच माहित नाही. तर आम्ही काय करावे कुलदेवता जरी माहीत नसली तरी तुमच्या घरामध्ये ज्या कुठल्या देवीचा फोटो तुम्ही ठेवला असेल व महालक्ष्मी असेल रेणुका माता असेल ज्या देवीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवली असेल तिच्यापुढे तुम्ही ओटी भरू शकता.

आणि तिच्याकडे प्रार्थना करू शकता की तुम्हाला तुमची कुलदेवता लवकरात लवकर कळूदे. आणि स्तोत्र मंत्र सुद्धा म्हणू शकता. तुमची सेवा निश्चितच आई जगदंबेपर्यंत पोहोचेल. आई जगदंबेचा उदो उदो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *