नमस्कार मित्रांनो.
अधिक मासातील पहिली एकादशी अर्थात कमला एकादशी २९ जुलैला आहे आणि या एकादशीला दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. तो असा की अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी तिथी सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळेच या एकादशीचे महत्त्व वाढलेला आहे. तस तर वर्षभरामध्ये २४ एकादशी येतात.
पण आता यंदा अधिक महिना आल्यामुळे दोन एकादशी आणखीन आलेले आहेत आणि यावर्षी २६ एकादशी आहेत. त्यापैकी ही कमला एकादशी मात्र अत्यंत महत्वाची आहे. या दिवशी तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.त्याचबरोबर संतान प्राप्ती होऊ शकते आणि पूर्ण फळाचा लाभ होऊ शकतो. मग नक्की करायचंय काय चला जाणून घेऊयात.
मंडळी मी मघाशी अधिक महिना श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि मद्य पक्षात एकादशी येते. प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या असतात.तसेच प्रत्येक एकादशीच नावही वेगळ असत वैशिष्ट्यपूर्ण असत. या एकादशीच्या नावावरन त्यांचा वेगळेपण ठरत आणि महत्त्व विशद होत.
पुरुषोत्तम महिना देणाऱ्या दोन्ही एकादशी या कमला एकादशी या नावाने ओळखल्या जातात आणि त्यापैकीच एक असलेली कमला एकादशी एकादशी ही २९ तारखेला आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे पुरुषोत्तम मासातील पहिली एकादशी शनिवारी २९ जुलै २०२३ ला आहे.
आता या दिवशी करण्याचे उपाय पाहूयात –
१) एक तर एकादशीच व्रत कराव दिवसभर उपवास करावा.भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. घरात जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुमच्या घरात पांडुरंगाचा फोटो असेल पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्याचीही पूजा तुम्ही या दिवशी करायची आहे.
२) त्याचबरोबर या कमला एकादशीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र श्री विष्णूंची पूजा केली तर माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची त्यांच्यावर कृपा होते. जीवनात येणाऱ्या संकटापासून त्यांना मुक्ती मिळते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. आणि जर तुम्हाला मुल असतील तर मुलांच्या प्रगतीसाठी ही विशेष लाभ होतो.
३) अस मानल जात की जर कमला एकादशीच्या दिवशी संतान गोपाळ मंत्र भक्ती भावाने आणि प्रामाणिकपणाने म्हटल जप केला त्या मंत्राचा तर संतान प्राप्ती होते. यासोबतच एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार ज्योतिषांचा सल्ला घेऊन आणि कुंडली लक्षात घेऊन या मंत्राचा जप करा.त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
आता बघुयात धनलाभ साठी काय करायच आहे –
१) धन लाभासाठी तुम्हाला एक स्तोत्र म्हणायचे आणि ते स्त्रोत्र म्हणजे विष्णुसहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राच कमला एकादशीला आवश्यक पठण कराव. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. घरात पैसा टिकतो.भगवान श्री कृपा होते. हा अगदी सर्वात साधा आणि प्रभावी ज्योतिषीय उपाय आहे. जो घरातल्या सगळ्या सदस्यांना सगळ्या प्रकारच्या समस्यांपासून वाचवतो.
आता तुम्ही म्हणाल की आम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणता येत नाही. मान्य इंटरनेटवर ऐकू तर शकता.ऐकल्याने सुद्धा पुण्य फळाची प्राप्ती होते. पण ऐकताना मन लावून ऐका नाहीतर स्तोत्र चालू केले आणि मनात मात्र दुसरेच विचार चालेल अस होता कामा नये. स्त्रोत्राचा प्रत्येक शब्द तुमच्या मनात रुजला पाहिजे. इतका मन लावून ऐकला पाहिजे तरच पुण्याची प्राप्ती होते.
२) आता कमला एकादशीच्या दिवशी लोककल्याण्याची काम केल्याने आपल्या जीवनात समृद्धी येते. लोक कल्याणाची काम म्हणजेच काय तर या दिवशी गोरगरिबांना दानधर्म करावा. सगळ्यात महत्त्वाच अन्नदान एकादशीच्या दिवशी केलेला अन्नदान कईक पटीने पुण्य फळ देऊन जात. या दिवशी पांढरे आणि पिवळे धान्य दान करावे.जर तुम्हाला मूल हव असेल तर एखाद्या गरीब मुलाला अन्नदान करावे.
मंडळी कमला एकादशीच्या दिवशी त्यादिवशी सांगितलेले हे खास उपाय करून बघा त्याबरोबर पिंपळाच्या झाडाला पाणी घालाव आणि तिथेही तुपाचा दिवा लावावा. या उपायाने सुद्धा आपल्या घरामधील आर्थिक समस्या दूर होतात कमला एकादशी अधिक महिन्यातली एकादशी अत्यंत सुंदर योग आहे आणि या योगाचा फायदा जास्तीत जास्त करून घ्या.
या दिवशी तुम्ही भागवत गीतेचा पंधरावा अध्याय म्हणू शकता किंवा भगवान श्री एखाद्या मंत्राचा जपही करू शकता तुम्हाला जे जमेल जो उपाय जमेल तो करा आणि या योगाचा फायदा तुमच्या कल्याणासाठी करून घ्या.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.