नमस्कार मित्रांनो.
श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. तो भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. चातुर्मासात जगा भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रा अवस्थेत जातात तेव्हा महादेव सृष्टिचक्र चालवतात असं म्हटल जात. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व आहे.
हा काळ महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी उत्तम आहे. आणि त्यातही श्रावणातील सोमवाराला तर जास्त महत्त्व आहे. यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होतो आहे. आणि २७ ऑगस्ट पर्यंत असेल. या दरम्यान एक तारखेला श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार आठ ऑगस्टला आहे.
तिसरा १५ ऑगस्टला आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावणी सोमवारी उपवास ठेवण्यात येतो. व्रतासाठी तुम्ही कशा प्रकारे सकस आहार घेऊ शकतात ते आता आपण बघूया. सकाळी लवकर उठून एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू मिसळुन घ्या हे शरीराला हायड्रेटर करेल. आणि आपल्या शरीराला डिटॉक्स काय करायला मदत करेल.
न्याहरीमध्ये एक ग्लास कोमट दूध आणि पौष्टिक फळांनी भरलेली वाटी तुम्ही घेऊ शकता. हे तुमच्या शरीराला ऊर्जा देईल आणि आवश्यक फायबर प्रदान करेल. आता बघूया की दुपारचा फराळ तुम्ही कसा करायचा. दुपारच्या फराळामध्ये साबुदाणा खिचडी किंवा सलाड तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या जेवणा मध्ये पोळी, भाजी, भात असा पौष्टिक जेवण करता येईल. उपवास काळामध्ये तळलेलं खाऊ नका. साखरयुक्त सेवन करू नका.
त्याचबरोबर मिठाचे प्रमाण ही जेवणामध्ये कमी ठेवा. श्रावण महिन्याचे महत्व संपूर्ण वर्षभर सोमवार हे भगवान शिवशंकर यांना समर्पित केले जातात. परंतु श्रावण महिन्यातील सोमवार विशेषता भगवान शिवशंकर आणि चंद्रदेवव यांच्या संबंधित एक आख्यायिका सुद्धा आहे. आणि ही आख्यायिका सोमवारी भगवान शिव शंकराची पूजा का केली जाते किंवा का महत्वपूर्ण आहे ते स्पष्ट करते.
असं मानलं जातं की जे व्रत करतात आणि सोमवारी भगवान शिवशंकराची मनापासून पूजा करतात. त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. पौराणिक कथांनुसार समुद्रमंथनात देव आणि दानव सहभागी झाले होते. तेव्हा समुद्रमंथनातून विषारी भरलेला कलश बाहेर आला. आणि त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी मध्ये हाहाकार माजू लागला.
म्हणून सृष्टीचा रक्षण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी ते विष पिऊन टाकल. विश्वाचे रक्षण केल. पार्वती मातेने भगवान शंकराची मान घट्ट धरून ठेवली होती. जेणेकरून ते विष त्यांच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणून भगवान शिवशंकराची मान निळी झाली. आणि त्यांना नीलकंठ म्हटल जाऊ लागल. आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांना गंगाजल लोकार्पण करतात.
अस मानल जात की अविवाहित मुलींनी सलग सोळा सोमवार व्रत केल. तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे इच्छित वर प्राप्ती होते. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.