नमस्कार मित्रांनो.
ग्रहांच्या परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. जेव्हा काही ग्रह एकत्र येतात तेव्हा विशिष्ट योग तयार होतात. ग्रहांच्या युती चा प्रभाव सुद्धा अनेक पटीने वाढतो. असाच ग्रहांचा योगायोग घडला आहे.
१८ जूनला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करताच पंच महापुरुष राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग चार राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत. मग कोणासाठी आहे हा पंच महा पुरुष राजयोग चला जाणून घेऊ या.
मंडळी बुध ग्रह आधीच वृषभ राशीमध्ये आहे. १८ जूनला शुक्राने सुद्धा वृषभ राशीत प्रवेश केला आहे. आणि त्याच वेळी शनिग्रहसुद्धा तीस वर्षानंतर त्याच्या स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे.
त्यामुळे ४ राशींच्या संक्रमण कुंडलीत पंच महापुरुष राजयोग तयार होतो आहे. आणि या योगाचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. ती पहिली रास आहे वृषभ रास.
वृषभ राशी- वृषभ राशीच्या लोकांचा गोचर कुंडलीत दोन महापुरुष राजयोग तयार होत आहेत. या राशीच्या लोकांना करियर मध्ये चांगले यश मिळेल. आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना सुद्धा चांगली नोकरी मिळेल. तसेच एखादे मोठे पॅकेज सुद्धा मिळू शकते. पदोन्नतीचे ही योग आहेत. त्याच बरोबर तुम्हाला या काळात पद प्रतिष्ठा या सगळ्याच गोष्टी मिळतील.
सिंह रास- सिंह राशीच्या गोचर कुंडलीत दोन राजयोग तयार होत आहेत. या स्थितीत कामात मोठे यश मिळेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. पैशांची आवक वाढेल. गुंतवणुकीसाठी सुद्धा चांगला काळ आहे.
वृश्चिक रास- या राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत दोन महापुरुष राजयोग तयार होत आहेत. नवीन नोकरी पदोन्नती पगारवाढ या सगळ्याचे चे योग आहेत. या लोकांना तर नोकरी व्यवसायात उत्तम यश मिळेलच पण एकूणच सर्वांगीन फायदा आणि विकास या लोकांचा होईल.
कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत पंच महापुरुष राजयोग तयार होत आहे. आणि हा राजयोग त्यांना भौतिक सुख तर देईनच पण त्याबरोबर ऐश्वर्य सुद्धा देईल. या काळात त्यांना भरपूर पैसे देखील मिळतील. कार, घर यासारख्या गोष्टींवर ते पैसे खर्च करू शकतात.
त्याचबरोबर वेळेचाही पुरेपूर फायदा घेऊ शकतात. मित्रांनो या राशींना ग्रहमान तर अनुकूल आहेच पण त्याच बरोबर याचा अर्थ असा नाही की त्यांनी कष्ट करण प्रयत्न करणं सोडायच आहे. उलट मी म्हणेन की तुम्ही दुपटीने कष्ट करा प्रयत्न करा दुपटीने प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत करा.
त्याच फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण ग्रहमान अनुकूल आहे. तुम्ही काही नवीन करू इच्छित असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. या काळामध्ये तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकता. नवीन उपक्रम देखील हाती घेऊ शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.