आपल्या देवघरात कोण कोणत्या देवींच्या मुर्ती असायला पाहिजे? अवश्य जाणून घ्या.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या देवघरात कोणकोणत्या देवींच्या मूर्ती असायला हव्यात. तूम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत. तर मित्रांनो भरपूर स्वामीभक्तांना स्वामी सेवेकऱ्यांना नेहमी प्रश्न पडत असतो. 

प्रश्न विचारत असतात. की आमच्या घरातल्या देवघरात आमही कोणकोणत्या देवीच्या मुर्त्या ठेवायला हव्यात. तर आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो आपल्या घरात कधीही जास्तीत जास्त देवीच्या मुर्त्या कधीच ठेवू नये. 

कमीत कमी देवींच्या मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण आपली सवय असते आपण कुठेतरी देव दर्शनाला जातो तर आपण सगळीकडून एक एक मूर्ती घेऊन येतो आणि ती मूर्ती आपण देवघरात स्थापन करत असतो याने दुसरे काही होत नाही.

फक्त देवघरात जागा कमी पडत असते दुसऱ्या देवांसाठी किंवा तिथे सगळ्यात गोंधळ होतो म्हणून आपल्या देवघरात नाही देवींच्याच नाही तर देवांच्या सुद्धा कमीत कमी मूर्ती असायला पाहिजे. तर आज आम्ही खास करून तुम्हाला फक्त देविन बद्दल सांगणार आहे. 

की कोणत्या देवी आपल्या देवघरात असायला हव्या. तर मित्रांनो अशा फक्त तीन देवी आहेत. त्यांच्या मुर्त्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच पाहिजे. आणि असायलाच पाहिजे तर मित्रांनो पहिली देवी आहे. 

ती म्हणजे लक्ष्मी माता लक्ष्मी माता यासाठी कारण ती धनाची पैशाची सुख समृद्धीची देवी आहे. आणि तिची पूजा तर आपल्या घरात आपण करायलाच पाहिजे. तरच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी आणि धनसंपदा येऊ शकेल. म्हणून आपल्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती असायलाच पाहिजे. 

त्यानंतर अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी आहे. आपल्या घरामध्ये आपण जेवण करतो धान्य भरून ठेवतो. त्याचा साठा करतो. त्यामध्ये कमी पडायला नको. आपल्याला दोन टाईम व्यवस्थित सुखात जेवण मिळायला पाहिजे. म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्या देवघरात व्हायलाच पाहिजे. म्हणून अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. 

त्यानंतर आहे आपली कुलदेवी आपल्या कुलदेवतेची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात असायलाच पाहिजे. कारण ती आपल्या कुळाची देवी असते. आपल्या परिवाराची देवी असते. आपले सुख दुःख हे फक्त तीच जाणू शकते. तिच आपले दुःख समस्या दूर करू शकते. म्हणून कूळाची देवी कुलदेवीची पूजा सुद्धा आपल्या देवघरात व्हायलाच हवी. 

म्हणून लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता आणि आपली कुलदेवी या तीन मुर्त्या तुमच्या घरात असायलाच पाहिजे. आणि तीन देवीच्या मुर्त्या सोडून तुम्हाला १/२ ज्या देवींवर विश्वास असेल. किंवा तुमची मान्यता असेल तुम्ही त्यांना मानत असाल. त्यांच्या मुर्त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकतात.

पण या ३ मुर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या देवीच्या मुर्त्या नाही सुद्धा ठेवल्या तरी चालेल. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स मधे नक्की विचारा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.