Skip to content

ऑक्टोंबर महिन्यात या राशीच्या लोकांना होणार धनलाभ. घोड्याच्या वेगाने पळणार यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. ग्रहनक्षत्राच्या बदलाचा ऑक्टोंबर महिन्यावर कसा परिणाम होईल. कोणत्या राशीसाठी आर्थिक चढाओढीचा जाईल.कोणत्या राशीच्या लोकांच्या खिशाला कात्री लागेल. आणि कोणत्या राशींवर लक्ष्मी कृपा होईल व धनलाभ होईल हे जाणून घेऊया. पहिली मेष रास.

मेष रास- आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून या महिन्यात शुभ संयोग घडतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला या महिन्यात एखाद्या महिलेची मदत मिळू शकेल. ऑक्टोंबर मध्ये तुमच्या तब्येतही बरीचशी सुधारणा होईल. आणि डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. या महिन्यात ही प्रवास पुढे ढकलल्यास बरे होईल.

वृषभ रास- कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि जितके संयम ठेवून काम कराल इतके तुम्हाला प्रकल्पात यश मिळेल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील. आणि धनप्राप्तीसाठी शुभ संयोग घडतील. आणि या बाबतीत कठोर परिश्रम करून पद मिळवलेल्या व्यक्तींची मदत मिळेल. 

प्रवासातून चांगले संदेश मिळू शकतील. आणि तुमच्या प्रवासाच्या पद्धतितही खूप बदल होईल. कोणीही तुमच्या अपेक्षेप्रमाणे जगणार नाही. आणि त्यामुळे तुमचे मन दुखवू शकते. ऑक्टोंबर च्या शेवटी तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी काही ठोस निर्णय देखील घेऊ शकता.

मिथुन रास- या महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आणि एखाद्या नवीन प्रकल्पात तुम्हाला आनंददायी परिणाम देऊ शकेल. सौजन्यशील प्रकल्प तुमच्यासाठी चांगली बातमी आणू शकतात. कुटुंबात सुख समृद्धी येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही एखाद्या आनंददायी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. 

आणि या संदर्भात कुठेतरी प्रवास करू शकता. या महिन्यात आर्थिक खर्चही जास्त होऊ शकतो. आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय या महिन्यात पुढे ढकलने चांगले नाही. ऑक्टोंबर च्या उत्तरार्धात अहंकारामुळे होणारा संघर्ष टाळाल तर बरे होईल.

कर्क रास- कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल गंभीर असाल. आणि तुम्ही तुमच्या सुंदर भविष्यासाठी काहीतरी नियोजन देखील कराल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. या महिन्यात तब्येतीत चांगली सुधारणा होईल. आणि पितृतुल्य व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतील. प्रवासातून शुभ वार्ता मिळतील. प्रवास वेळेवर पूर्ण होतील. ऑक्टोंबर च्या शेवटी काळ अनुकूल होईल आणि सुख समृद्धी प्राप्त होईल.

सिंह रास- कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आणि वेळ अनुकूल राहील. या महिन्यात तुम्ही नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होऊ शकतात.आणि खर्चही वाढू शकतो. या काळात भूतकाळातील आठवणी तुम्हाला त्रासदायक ठरतील. कुटुंबात तुम्ही ज्या प्रकारचा आनंद शोधत आहात तो मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो.

तूळ रास- या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि धनवृद्धीसाठी शुभ योगायोग ही घडतील. ऑक्टोंबर च्या सुरुवातीला तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटू शकेल. परंतु शेवटी गुंतवणूक तुमच्या बाजूने निर्णय देईल. कार्यक्षेत्रात सुधारणा होईल. आणि वेळ अनुकूल राहील. ऑक्टोबरच्या शेवटी मन थोडे उदास राहू शकते.

वृश्चिक रास- आर्थिक फायद्याची मजबूत परिस्थिती असेल. आणि कोणीतरी तुम्हाला याबाबतीत मदत करू शकते. प्रवासातून चांगले संदेशही मिळतील. आणि यशही मिळेल. आणि कामाच्या ठिकाणी संघर्षातून ताण वाढू शकतो. कुटुंबात तणावाची परिस्थिती वाढू शकते. महिन्याच्या शेवटी सुख-समृद्धीचे योग तयार होतील.

धनु रास- ऑक्टोंबर मध्ये केलेले प्रवास तुमच्यासाठी शुभ आणि यश मिळवून देणारे ठरतील. तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करण्याचाही निर्णय घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी संवादातून परिस्थिती सुधारेल. या महिन्यात तुमच्या आळशीपणामुळे खर्च वाढू शकतात. कुटुंबातील स्त्रियांच्या आरोग्य बाबतीत मन अस्वस्थ राहू शकते.

मकर रास- या महिन्यात तुमचे कुटुंब तुम्हाला कामात पूर्ण सहकार्य करेल. आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करेल. आर्थिक संपत्तीचे प्रसंग येतील. परंतु निष्काळजीपणा न केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडेसे बंधन वाटू शकते. 

किंवा तुमचा बॉस तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. या महिन्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ऑक्टोंबर च्या शेवटी उत्साहाचे वातावरण राहील. आणि मन प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *