नमस्कार मित्रांनो.
२०२३ हे नवीन वर्ष लवकर सुरू होणार आहे. आणि ते कन्याराशीसाठी कस असणार आहे. चला जाणून घेऊया. कन्या राशीच्या आर्थिक स्थिती पासून सुरुवात करू. कन्या राशीच्या लोकांना यावर्षी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कारण ग्रहांचा सहयोग अशाप्रकारे आहे की वर्षाचा पूर्वार्ध थोडा प्रतिकूल असेल. विशेषतः ऑक्टोबरच्या अखेरपर्यंतचा काळ आव्हानात्मक असू शकतो.
आर्थिक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागेल. तर तुम्ही शेअर बाजार सट्टेबाजी लॉटरी अशा बाबतीत गुंतलेले असाल तर या काळात तुम्हाला तोटा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जरा सावधगिरीनेच पाऊस उचला. तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत वाटू शकेल. काळजी घ्या पण काळजी करू नका.
कारण ऑक्टोंबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने तुम्हाला यश मिळवून देणारे जातील. आता बघूया नोकरी व्यवसायाबाबत यावर्षी कन्या राशीच्या लोकांनी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या करिअरमध्ये योग्य ते निर्णय घेण्याची गरज पडेल. जानेवारी महिन्यात तुमची बदली होऊ शकते. यावर्षी तुमची कारकीर्द तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप चांगल्या संधी देईल.
स्वतःबद्दल बेफिकीर मात्र राहू नका नाहीतर तुम्हाला नुकसान मात्र सहन कराव लागेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चढउतारांना सामोरे जावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही अचानक बदल होऊ शकतात किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर एप्रिल नंतर व्यवसायातही
काही बदलांची शक्यता आहे. विशेषतः मे महिन्यात असा योग तयार होतो आहे. की तुम्ही एखादं काम केलं तर त्यात अचानक काहीतरी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने पुढे टाकायचा आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान परिस्थितीत बदल होतील. आणि परिस्थिती निश्चित चांगली होईल. जी तुम्हाला पावलोपावली यश मिळवून देईल. कौटुंबिक बाबींचा विचार करता हे वर्ष कन्या राशीसाठी चढउतारांच असणार आहे.
पण २२ एप्रिल नंतर मात्र कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात मतभेद होऊ शकतात. किंवा राहूच्या प्रभावाने कौटुंबिक जीवनात तणावही वाढू शकतो. पण देवाने तुमच्यात अशी क्षमता दिली आहे की तुम्ही सगळ्याच आव्हानांना उत्तमपणे तोंड द्याल. आणि त्यामध्ये टिकून राहाल. तुमच कुटुंब एकत्र आल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.
यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. स्वतःला शांत ठेवा आणि कुटुंबातील सदस्यांची वारंवार बोलून प्रकरण शांत करा. हळूहळू कौटुंबिक जीवन चांगल होऊ लागेल. आणि मी ते ऑक्टोबर दरम्यान कुटुंबात कोणाच्या तरी विवाहाची चर्चा सुद्धा सुरू होईल. आणि इतकाच नाही तर नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये विवाह होऊ सुद्धा शकतो.
ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असेल आणि जे घरात वातावरण आनंदी करेल. आता ज्या काही अडचणी तुम्हाला येणार आहे. २०२३ मध्ये त्यासाठी तुम्ही ज्योतिषी उपाय करू शकतात. ते उपाय जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बुधवारी उपवास ठेवा. आणि उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर बुधवारपासून रोज श्री विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायला सुरुवात करा. म्हणता येत नसेल तर सुरुवातीला ऐकायला सुरुवात करा. ऐकता ऐकता हळूहळू म्हणता देखील येत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.