Skip to content

करा फक्त हे ५ उपाय…नकारात्मक शक्ती निघून जातील व समाधान पसरेल..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूपदा अडचणींचा डोंगर लागलेला असतो, त्यामुळे आपण खूप दुःखी आणि कष्टी बनतो. कधी कधी आपण एखाद्याच्या घरी जातो, तर तिथे त्यांच्या घरात आपणाला अशांती जाणवते. काहीवेळा आपल्याच घरात असे होत असते.

सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे घरातील सदस्यांची मानसिकता देखील दुःखी बनते, घरात वादविवाद सुरू होतात आणि एकूणच वातावरण दगदगीचे बनते जे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अपायकारक असते. अशा वातावरणात राहिल्याने आपल्या मनावर वाईट परिणाम होतो.

मित्रहो प्रत्येक गोष्टीत विशिष्ट प्रकारच्या लहरी असतात, काही माणसांच्या बोलण्यात देखील लहरी असतात. चांगल्या विचारांच्या माणसांच्या लहरी या चांगल्याच असतात तर वाईट विचारांच्या माणसांच्या लहरी या वाईटच असतात.

जर आपण वाईट विचारांच्या माणसांच्या सानिध्यात जास्त राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवर होऊन आपली प्रगती खुंटते. आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. 

जर तुम्ही रात्री एका वाटीत साखर घालून ठेवला आणि रात्रभर ती वाटी उघडी तशीच ठेवला व त्याला तरीही मुंग्या लागल्या नाहीत तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे.

तसेच जर तुम्ही तुळशीचे रोप लावला, आणि लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर ते रोप कोमेजले तर त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती वास करत असते. तसेच जर तुमच्या घरात     भरपूर पैसा येत असेल आणि तरीही त्याचा सदुपयोग न होता सगळा पैसा दवाखान्यात जात असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती खूप जास्त आहे. 

तसेच जर कधी घरातील भिंतीला भेगा पडत असतील तर त्यावेळी बाहेरील नकारात्मक ऊर्जा आतमध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे घरातील वातावरण खूपच वाईट होते, भांडण तंटा सुरू होतो. पण जर घरातील नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर घरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल अशी घराची ठेवण असावी. 

सूर्यप्रकाशामधून भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्या घरामध्ये थोडा वेळ देखील सूर्यप्रकाश येत नसेल त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते. तसेच घराच्या अंगणात जास्तीत जास्त फुलांची रोपे लावावीत, विशेष करून पारिजातकाचे रोप लावावे. 

त्यांच्या सुगंधामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. जेव्हा तुम्ही घरातील फारशी पुसता तेंव्हा त्या पाण्यात थोडेसे मीठ टाका, तसेच घरात दिवसातून तीन वेळा शंख फुकावा. त्यामुळे त्याच्या नादमय आवाज जेवढया दूर जाईल तेवढया दूरवर नकारात्मक ऊर्जा येत नाही.

तसेच आठवड्यातून एक दिवस तांब्याचा तांब्या घेऊन गायत्री मंत्र म्हणावा. व ते पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नक्कीच घर सोडून निघून जाईल. तसेच घरात सकाळी उठल्यावर मंत्र, भजन लावावे. त्यामुळे वातावरण चांगले राहते. 

तर मित्रहो हे उपाय नक्की करून पहा, त्यामुळे जीवन सुखमय होऊन जाईल. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *