Skip to content

कर्क रास मे महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कर्क ही राशिचक्रातील चौथी रास असून या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अत्यंत हळुवार पण नाजूक वृत्तीचा आणि स्वभावाचा. मित्रांनो या राशीचे बोधचिन्ह आहे खेकडा एखादी गोष्ट धरली तर ती नांगी तुटली तरी सोडायचे नही. अशा वृत्तीचे हे लोक असतात.

तर चला पाहूया कर्क राशीसाठी हा महिना कसा असणार आहे. मंडळी या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर ताळमेळ वाढेल. घरातील सर्व सदस्यांनी मध्ये विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या भावाबहिणींचे सहकार्य मिळेल. जे तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.

कुटुंबातील सर्व सदस्यांचा कल अध्यात्माकडे असेल आणि घरात काही धार्मिक कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आहे. नातेवाईकांचे घरी येणे-जाणे चालतच राहील. त्यामुळे व्यस्तता राहील. या काळात तुमच्या स्वभावात नरमाई ठेवा.

गेल्या महिन्यात व्यापाऱ्यांचे जे नुकसान झाले होते. ते या महिन्यांमध्ये खूपच कमी होईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा महिना चांगला जाईल. तुम्हाला नवीन कल्पना देखील मिळतील. त्याच्या आधारे तुम्ही तुमचे नवीन काम करण्याचा विचार करू शकता. भविष्यात हे काम तुमच्या साठी खूपच फायदेशीर ठरेल.

आता वळूया सरकारी नोकरी करणार्‍यांकडे सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना धकाधकीचा असेल. त्यामुळे त्यांना खूपच काम करावे लागेल. आशा वेळात कुटुंबासाठी खूप कमी वेळ मिळेल. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात नक्कीच थोडी विश्रांती मिळेल. 

परंतु त्यांनी त्यांच्या कार्यालयीन राजकारणापासून थोडे दूर रहावे. अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात नवीन संधी मिळणार नाही. पण अशा मात्र ठेवा. या वेळी केलेली मेहनत भविष्यात उपयोगी पडेल.

विवाहित लोकांसाठी हा महिना विशेषतः चांगला राहील. गृहिणींसाठी खूप चांगला राहील. या महिन्यात तिला तिच्या जोडीदाराकडून एखादी नवीन वस्तू मिळू शकते. ज्यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर आहात तर ही समस्या देखील या महिन्यांमध्ये दूर होईल. 

जे अविवाहित आहेत आणि जीवन साथी शोधत आहेत. त्यांना या महिन्यात लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. अविवाहित लोकं सोशल मीडियावर एखाद्याशी सकारात्मक संभाषण देखील सुरू करू शकतात. परंतु काही कारणास्तव ते थांबेल. अशा परिस्थितीत आपण आधीच सावधगिरी बाळगल्यास चांगले होईल.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना शुभ संकेत देत नाही. तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आधीच गंभीर आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात रहा. अन्यथा अचानक आजार वाढू शकतो. काही कामासाठी घराबाहेर जावे लागत असेल तर पूर्ण काळजी घ्या.

त्याचबरोबर आपण मानसिक दृष्ट्या सुद्धा पूर्णपणे निरोगी असाल. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. रोज नवे विचार मनामध्ये येतील. आणि तुम्ही स्वतःला नवीन ऊर्जा द्याल. मे महिन्यात कर्क राशीचा भाग्यशाली अंक आहे ७ आणि शुभ रंग असेल केसरी. 

जर तुम्ही या महिन्यात सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा अपघात होण्याची शक्यता असल्याने तुम्ही गाडी चालवू नका. जर दुसरे कोण गाडी चालवत असेल तर तुम्ही सुरक्षित आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *