Skip to content

कर्क रास २०२४ मध्ये होणार लाभच लाभ, या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

येणार नवीन वर्ष २०२४ हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने अनुकूल असणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. भरपूर लाभही होताना दिसेल. यावेळी अध्यात्मात तुमची रुची वाढू शकते. यावर्षी तुमच उत्पन्न वाढणार आहे ही तुमच्यासाठी आहे खास बातमी. आणखीनही अनेक शुभ परिणाम तुम्हाला वर्ष २०२४ मध्ये मिळणार आहे. पण परिणाम काय असणार आहेत चला जाणून घेऊया.

मंडळी कर्क रास कर्क राशी अतिशय प्रेमळ रास आहे. राशीचक्रातील चौथी रास आहे. या लोकांच इतरांच्या बद्दल दृष्टिकोन हा अतिशय सहानुभूतीचा असतो. पण ती सहानुभूती यांना मिळेलच अस मात्र नाही. कर्क राशीच्या लोकांमध्ये अनेक चांगले गुण आढळून येतात. पण त्यांना मिळालेल्या या दैवी गुणांचा उपयोग हे लोक करताना मात्र क्वचितच दिसतात. कर्क राशीची लोक भावनांवर लाजाळू आणि मनस्वी असतात.

आयुष्यातील वाऱ्या वादळाला तोंड देण्याचा सामर्थ्य मात्र त्यांच्याकडे असतो बर का तर अशा या प्रेमळ कर्क राशीसाठी वर्ष २०२४ ची सुरुवात करिअरमध्ये प्रचंड चांगल्या संधी घेऊन येणार आहे. तुमचा पगार यंदा वाढणार आहे. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता तर आहेच परंतु ते पैसे हुशार येणे खर्च करावे लागतील. कारण अनावश्यक पणे पैसे खर्च केले तर नुकसान होऊ शकत.

यावेळी कोणती गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली नाही त्यामुळे गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा. कौटुंबिक दृष्ट्या विचार करता कौटुंबिक जीवन खूप चांगले यावर्षी तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायच झाल तर ते सुसंवादी आणि शांत असेल. मी तुमच्या कुटुंबासह विशेषतः तुमच्या आई सोबत अत्यंत उत्तम वेळ घालवाल. तुमच्या आईची तुमचे नाते घट्ट होईल.

तुमच्या आई तुमची सपोट सिस्टीम बनेल. यावर्षी भविष्यासाठी अनेक योजना तुमच्या घरात बनवल्या जातील. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांच्या योजना बनवण्याच्या कार्यामध्ये सहभागी व्हाल. त्याबरोबरच तुम्ही स्वतःही काही योजना बनवत असाल तर संपूर्ण कुटुंबाला त्यात सहभागी नक्की करून घ्या.

करिअरच्या बाबतीत सांगायच झाल:- तर यावर्षी तुम्हाला तुमच्या कामात तुम्हाला खूप मान सन्मान मिळेल. तुमच्या कामामुळे तुमची ओळख होईल यावेळी तुम्ही तुमच्या कामातही समाधानी असाल. तुम्हाला मात्र ज्या काळात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. जर तुम्हाला यावर्षी उच्च शिक्षण घ्यायचा असेल तर तुम्हाला यावर्षी परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते.

परंतु त्यासाठी मेहनत मात्र करावी लागेल आणि तुमच करिअर नक्कीच यावर्षी चांगला परिणाम देताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर या वर्षाची सुरुवात तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने चांगली होईल. तुमच्या जीवनसाथी सोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. तर तुम्ही आणि तुमच्या प्रियकराचा एकमेकांवर विश्वास असेल तर तुमच प्रेम जीवन संतुलित राहील. वर्ष २०२३ मध्ये ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांच्या लग्नाचे योग सुद्धा २०२४ मध्ये आहेत. त्यामुळे स्थळ बघायला काही हरकत नाही.

आरोग्याचा विचार करता काळजी घ्यावी लागेल:- या वर्षी तुम्हाला स्वतःची पूर्णच काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यात तुमचा आरोग्य सुधारेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान आरोग्य उत्तम राहील. फक्त वर्षाच्या सुरुवातीला काही छोट्या मोठ्या समस्या जाणवू शकतात. सर्वात महत्त्वाचे वाहन जपून चालवा शक्य असल्यास वाहन दुसऱ्याला चालवायला द्या आणि स्वतः त्यांच्याबरोबर जा.

जर तुम्हाला काही जुन्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर या काळात तुमच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे आवश्यक आहे. आता ज्या काही समस्या कर्क राशीच्या जीवनामध्ये २०२४ मध्ये येणार आहेत त्यासाठी ज्योतिषीय उपाय सुद्धा आहेत.

१) आता मगाशी मी म्हटल तस जे लोक अविवाहित आहेत आणि लग्न करण्याची त्यांना इच्छा आहे. अशा लोकांनी स्थळ बघायला जाताना. त्या समोरच्या व्यक्तीला काळी वस्तू भेट देऊ नये. २) त्याचबरोबर दर शनिवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. ३) तसाच अधिक पांढरे गुलाबी किंवा इतर कोणत्याही हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

४) जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी. ५) कर्क राशीच्या लोकांनी २०२४ मध्ये शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ पंचमुखी दिवा लावावा आणि रोज स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये साखर आणि फुल टाकून ते पाणी सूर्याला अर्पण करावे. हे सूर्योदयाच्या वेळी करायचा आहे.

या प्रकारच्या उपायांनी तुमच्या जीवनात ज्या काही थोड्याफार समस्या आहेत त्या समस्या दूर व्हायला मदत होईल. हे सगळे उपाय करायला जमत नसतील तर यातला कुठलाही एक उपाय निवडावा आणि तो नियमित करावा. मंडळी कर्क राशीच्या स्त्रिया ज्या असतात त्या अत्यंत प्रेमळ प्रपंचात रमून गेलेल्या गृहकृत्यदक्ष धार्मिक वृत्तीच्या घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या असतात. फक्त त्यांनी स्वतःच्या या कलागुणांकडे जरा लक्ष द्यायला हव. २०२४ मध्ये तुम्ही संकल्प करू शकता आणि तुमच्या मते असणाऱ्या या कलागुणांना वाव देऊ शकता.

जेणेकरून भविष्यात त्याचा तुम्हाला लाभ होईल. स्वतःपेक्षा कर्क राशीच्या स्त्रियांनी इतरांचा विचार करतात. पण आता २०२४ मध्ये थोडा विचार स्वतःचाही करा आणि स्वतःच्याही भावनांना मत द्या. स्वतःलाही आनंद कशात मिळत आहे हे ओळखायला शिका. या राशीच्या व्यक्ती जरी प्रेमळ कोमल असल्या तरी खेकडा ज्याप्रमाणे खडकाला घट्ट धरून ठेवतो. त्याप्रमाणे या व्यक्ती त्यांच्या काही व्यक्तिगत मतात आणि तत्वात तडजोड करत नाहीत. हे सुद्धा तितकच खर

मित्रांनो कर्क राशीच्या व्यक्तींना मनाने समजून घ्यावे लागते. हृदयाची भाषा त्यांना कळते आणि हृदयाची भाषा जो जाणतो तोच या राशीवर प्रेम करू शकतो. अलंकाराने पैशाने वस्त्राने ही राशी प्रेम करू शकणार नाही. फक्त प्रेमानेच प्रेम करू शकते. कर्क राशीच्या स्त्रियांबद्दल बोलायच झाल तर त्या उत्तम परिचारिका होऊ शकतात. अर्थात उत्तम नर्स होऊ शकतात. त्यांच्यामध्ये भाबडेपणा असतो. कर्क राशीच्या पुरुषांमध्ये सुद्धा प्रेमळपणा बघायला मिळतो.

कर्क राशीच्या व्यापारी वर्गास पांढऱ्या प्रवाही पदार्थांचे व्यापर गृहपयोगी वस्तूंचा व्यापार चांदी दुध दही फळ फळावळ बागायती भाज्यांचा व्यापार लाभतो. आयुर्वेदिक डॉक्टर या राशीवर यशस्वी होतो. कारण चंद्र वनस्पतींचा कारक आहे. करकेच्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्र मानसशास्त्र मानसरोगतज्ञ स्त्रियांच्या रोगांचा तज्ञ या पद्धतीचे तज्ञ झाले तर त्यांना अधिक लाभ होतो. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्राची शीतलता सौम्यपणा हे गुण कर्क राशीच्या लोकांमध्ये पाहिला मिळतात.

कर्क राशीच्या लोकांना म्हणूनच सल्ला दिला जातो थोडासा व्यावहारिक दृष्टिकोन स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आणण्याचा कारण सतत भावनेवर निर्णय ही लोक घेतात आणि त्यामुळे कधी कधी त्यांच नुकसान होत. थोडासा व्यवहारी दृष्टिकोन ठेवा थोडासा स्वतःचाही विचार करा. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि इतर तुमचा फायदा घेणार नाही. मित्रांनो तुम्हाला जशी उत्सुकता आहे की २०२४ हे वर्ष तुमच्यासाठी कस जाणार आहे तशीच उत्सुकता अगदी सगळ्यांना असते आणि म्हणूनच मेष राशी पासून ते मीन राशीपर्यंत अगदी बारा राशींचे राशीभविष्य लोकमत बातम्या खास तुमच्यासाठी घेऊन आलेय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *