Skip to content

कशा असतात मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्ती? या व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तिमत्व असते असे..! बघा तुमच्या बद्दल काही विशेष.

नमस्कार मित्रांनो.

तुमचा जन्म मार्चमध्ये झालाय का? किंवा तुमच्या घरात कोणी मार्चमध्ये जन्मलेला आहे का? किंवा तुमची मित्र मैत्रीण किंवा जवळची एखादी व्यक्ती मार्चमध्ये जन्मलेले आहे का?अहो मग तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचायलाच हवा.कारण मार्च महिन्यांमध्ये जन्मलेली व्यक्ती असतात तरी कशा हेच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.

चला आता वळूया मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींकडे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जन्माचा आपल्या आयुष्यातील अनेक रहस्य सांगतो बर का आणि म्हणूनच आपण बघूयात मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे काय वैशिष्ट्य असते.

मार्चमध्ये जन्मलेले लोक मनाने कोमल असतात. या महिन्यात जन्मलेले लोक दानशूर असतात आणि धार्मिक स्वभावाचे असतात. धर्म आणि समाजाच्या हितासाठी कार्य करण्यात नेहमी पुढे असतात. त्याचबरोबर मार्चमध्ये जन्मलेले व्यक्ती मनमिळाऊ असल्याने अनोळखी व्यक्ती सोबत यांची चटकन ओळख होते. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे वैचारिक दृष्ट्या ती लोक महत्वाकांक्षी असतात.

मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्ती दिसायला साधारण असल्या तरीसुद्धा वैचारिक दृष्ट्या गंभीर असतात. या व्यक्तींना जोपर्यंत एखाद्या विषयाबद्दल पूर्ण माहिती होत नाही तोपर्यंत तोंडातून शब्दही काढत नाहीत आणि योग्य वेळ आली की बोलतात याचा यांना फायदाच होतो. मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांना जबाबदारीची चांगली जाणीव असते. त्यांना जी काही जबाबदारी देण्यात आलेली आहे ती जबाबदारी ही लोक उत्कृष्टपणे पार पाडतात.

प्रत्येक कामाचा पूर्ण आदर करतात. कामाला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करतात आणि हीच गोष्ट असते त्यांना यशस्वी बनवते. त्याचबरोबर ही लोकं नैतिक मूल्यांचा सुद्धा संवर्धन करणारी असतात. यांचा स्वभाव बोलका असतो. एकच नाहीतर बोलण्याची कला त्यांना अवगत असते असेही म्हणायला हरकत नाही. पण काही वेळा यांच्या आती बोलल्यामुळे समोरची व्यक्ती वैतागणे सुद्धा असू शकते. याची मात्र त्यांनी काळजी घ्यायला हवी.

मार्च महिन्यात जन्मलेले लोक हट्टी असतात. त्यांच कस असत माहितीये का एक बार जो मैंने कमेन्ट्स कर दी तो फिर मै आपने आपकी भी नही सुनता या अशा प्रकारात ही लोक मोडतात आणि त्यामुळेच बऱ्याचदा ही लोक आडमुठेपणा वागतात की काय अस समोरच्याला वाटू शकत. कारण परिस्थितीनुसार ते त्यांचे निर्णय बदलत नाहीत. परिस्थितीचा अंदाज घेत नाहीत.

आता मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना आवड कशाची असते ते पाहूयात महिलांना चांगल राहण्याची आवड असते. त्याचबरोबर मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांना साहस प्रकाराची सुद्धा आवड असते. रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यात त्यांना फार रस असतो. धर्म आणि अध्यात्म सुद्धा त्यांना उत्सुकता असते.

मार्चमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोण कोण आहे ते पाहूया. अमीर खान, राणी मुखर्जी, हनी सिंग, कल्पना चावला, कंगना रानौत, रोहित शेट्टी, राजपाल यादव, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ आणि शंकर महादेवन या आहेत मार्चमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती‌. आता मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना काही अडीअडचणी येत असतील त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यांनी काय उपाय करायचा आहे.

त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायचे आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या कुठल्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. अस केल्याने त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील यांची कामे लवकर पूर्ण होतील. त्याचबरोबर त्यांनी दर रविवारी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मध मिसळून ते अर्घ्य सूर्याला अर्पण कराच आहे.

अर्थात ते जल सूर्याला अर्पण करायचा आहे. याचा सुद्धा त्यांना फायदा निश्चितच होईल. आता मार्चमध्ये जन्मलेले व्यक्तींसाठी लकी नंबर कोणत्या असतात-३,७,९ यांच्यासाठी शुभ रंग असतो- हिरवा, पिवळा आणि गुलाबी आणि यांच्यासाठी लकी डे असतात.

रविवार, सोमवार आणि शनिवार मग मंडळी तुमच्याकडे कोणी मार्च महिन्यामध्ये जन्मलेला आहे का आणि त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळतय थोड कमी जास्त होऊ शकत. पण किती टक्के जुळतय हे नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *