नमस्कार मित्रांनो.
मंडळी राशीचक्रातील सातवी राशीनंतर येणारी राशी तुळ नक्की काय आहे तू राशीचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट्ये याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचा आहे आजच्या या भागामध्ये. मंडळी तूळ राशीबद्दल एका शब्दात सांगायच झाल तर अतिशय संयमी व्यक्तिमत्व तूळ ही राशीचक्रातील सातवी राशी असून तिचा स्वामी ग्रह शुक्र जो सौंदर्य आणि कला यांचा संबंध जोडणारा ग्रह आहे.
वायु तत्वाची राशी असून राशीचा वर्ण शूद्र म्हणजेच पडेल ते काम स्वतःवर अतिशय तत्परतेने मनापासून करणारा कामसू व्यक्तिमत्व म्हणजे तुळ राशी आणि म्हणूनच या राशीला समतोल आणि ऊर्जा वान राशी अस संबोधल जात. आपल्या कामाच्या बाबतीत निर्णयाच्या बाबतीत तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत टापटिपणा आणि वेळेची कमालयाची शिस्त आढळते.
राशीचे बोधचिन्हाचा तराजू आहे. तोलमोल करून बोलणाऱ्या आणि न्याय बुद्धीची ही राशी समजली जाते. कोणावरही अन्याय होणार नाही याची स्वतः जातीने दखल घेतात. इतरांकडूनही चूक होणार नाही आणि स्वतःकडून सुद्धा चूक होणार नाही याची फार काळजी घेतात. यांच्या या न्याय बुद्धीमुळे समाज कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वादविवाद ही मंडळी अगदी सहज रीतीने सोडवताना दिसतात आणि त्या वादामध्ये दोन व्यक्तींमध्ये कुटुंबामध्ये अतिशय हुशारीने समेट सुद्धा घडवून आणतात.
कला सौंदर्याची नजर यांच्यामध्ये अगदी जन्मजात असते. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त कलेच्या क्षेत्रात सुद्धा यांना शिक्षण घ्यायला लहानपणापासूनच प्रोत्साहन दिल तर पुढे जाऊन कला क्षेत्रामध्ये ही मंडळी आपल बस्तान उत्तम रीतीने बसवतात. यांचा गुणवैशिष्ट्य म्हणजे जरी स्वतःहून कलेचा क्षेत्रात काही केल नाही तर कलेला प्रोत्साहन देण्याचा मात्र मनापासून प्रयत्न करत असतात.
सौंदर्य कला त्यांची आवड असली तरी त्यांना भडकपणा दिखाऊ पणा त्यांना बिलकुल आवडत नाही. त्यांच्या साधेपणामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सौंदर्य लपलेला असत. वायु तत्वाची राशी असल्यामुळे अत्यंत अभ्यासू आणि हुशार असतात ही मंडळी नवनवीन विषय शिकायला नवनवीन विषय समजून घेयला यांची नेहमीच तयारी असते.
तसेच वर्ण शूद्र असल्यामुळे कोणत्याही काम करायला ही मंडळी बिलकुल लाजत नाहीत. उलट कोणत्याही कामांमध्ये स्वतः सहभागी होऊन नेहमी दुसऱ्याला आपली मदत कशी होईल याकडेच यांच्या स्वभावाचा कल प्रवृत्ती ही जास्त असते आणि म्हणूनच सामाजिक कार्यांमध्ये यांचा सक्रिय स्वभाव असतो.
आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाचा आपण काही देना लागतो ही जाणीव यांच्यामध्ये नेहमी जागृत असते. त्यामुळे कोणतेही सामाजिक, कौटुंबिक,राजकीय, राष्ट्रीय अशा काळामध्ये जेव्हा अडचणी निर्माण होतात. तेव्हा मदत करायला या राशीची मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आणि पुढे असतात. मात्र खोटं यांना अजिबात चालत नाही.
मग ती व्यक्ती घरातील असो किंवा कुटुंबातील किती जवळची असली तरी पक्षपात मंडळी कधीच करत नाही आणि न्यायबुद्धीने वागून त्याच्या बाजूने उभे राहते. मग तो परका असला तरी चालेल. शुक्र आणि वायू तत्वाचे अमलाखाली ही राशी येत असली तरी शुद्ध प्रेमाचा प्रतिक ही राशी समजली जाते. यांना सहवासाची आवड जास्त असते.
समाजप्रिय अशी ही राशी आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये विचारी, शांतपणा, मनाचा समतोल यांच्या मध्ये चांगलाच आढळतो इतर बारा राशींपैकी एकंदरीत यांचा जीवन प्रवास पाहिला असेल हि राशी जीवन जगण्याची कला शिकलेली आहे अस नेहमी यांच्याकडे आणि यांच्या व्यवहाराकडे पाहिलना की आपोआप वाटत.
कोणत्याही प्रकारचा व्यापार उद्योग जर यांनी सुरू केला तर यामध्ये हमखास यशस्वी होणारी राशी म्हणजेच तूळ राशी. न्यायदान करण्याकडे यांचा कल असल्यामुळे वकील, न्यायाधीश, कायदा अशा क्षेत्रांमध्ये अपेक्षित यश तूळ राशीचे जातक मिळवतातच. तसेच उच्च शिक्षण घेऊन सरकारी क्षेत्रामध्ये अधिकार संपन्नता सुद्धा मिळवताना दिसतात ती ही तूळ राशीची मंडळी.
कला क्षेत्राची सुद्धा यांचे सूर चांगले जमतात. त्यामुळे इंटरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, मिडिया अशा क्षेत्रामध्ये यांचा जम अतिशय उत्तम रीतीने बसवतात. तसेच हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा करायला आवडत. ही मंडळी खवय्या असतात.
आरोग्याचा विचार करता सर्दी, खोकला, कफ, त्वचेचे आजार, इन्फेक्शन, एलर्जी (विशेष करून त्वचेची), तसेच मुत्राशय, किडनी यांचा आजारा बाबतीमध्ये तूळ राशीला संभाळावं. लागत. मधुमेहाचा धोका सुद्धा या राशीमध्ये सर्वात जास्त असतो. म्हणूनच ध्यान चिंतन योगा यांच्याकडे अवश्य लक्ष उत्तम राहत. महालक्ष्मीची उपासना ही तूळ राशीसाठी अतिशय उत्तम राहते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद