कुंभ राशि- जुलै महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी कुंभ राशीतील जातकांसाठी हा महिना सगळ्याच क्षेत्रात यश घेऊन येणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून कुंभ राशीसाठी हा काळ चांगला आहे. महिन्याच्या सुरुवातीमध्ये नव भागाचा मालक मंगळ पराक्रम भावात असून नव भागात असावा आणि दशम भावावर पूर्ण दृष्टी करेल. 

त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे.

करिअरला पुढे नेण्यात तुम्ही पूर्ण योगदान देऊ शकता. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळू शकतं. सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करत असणाऱ्या जातकांना सुद्धा यश मिळेल. व्यवसायात उन्नती होईल. तुमच्यासाठी नवीन व्यवसायाचे मार्गही खुले होतील. 

विदेशी व्यापारासाठी जोडलेल्या जातकांना अन्य परिणाम मिळतील. शिक्षण क्षेत्रात जोडलेल्या कुंभ राशीतील लोकांना ही चांगली वेळ आहे. महिन्याच्या पंचम भावात सूर्य आणि दुधाची युती होण्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. कुंभ राशीतील लोकांना कौटुंबिक दृष्टीने सुद्धा हा काळ तसा सामान्य राहील. 

महिन्याच्या सुरुवातीमध्ये द्वितीय भावात कुंभ राशीचा बृहस्पती असेल आणि कुटुंबात प्रेम वाढेल. एकमेकांच्या प्रति आधीपेक्षा जास्त विश्वास वाटेल. कुंभ राशीतील लोकांसाठी प्रेम संबंधा बदल बोलायचं झालं तर काळ चांगला आहे. पंचम भावाचा स्वामी बुध ग्रह आपल्या स्वतःच्याच राशीमध्ये पंचम भावामध्ये सूर्याबरोबर असल्यामुळे प्रिय व्यक्तींसोबत तुमचं प्रेम वाढेल. 

आधीपासून चालत असलेले वाद दूर होतील एकमेकांच्या प्रतिविश्वास वाढेल. विवाहित लोकांना सुद्धा हा काळ चांगला आहे. सत्यम भावाचा स्वामी सूर्य पंचम भावात विराजमान असल्याने दाम्पत्य जीवनात उत्तम संबंध प्रस्थापित होतील. जीवनसाथी सोबत असलेले वादही मिटतील. 

आर्थिक दृष्टीने तर काळ चांगलाच आहे. तुमचे संपत्तीबाबतचे काही वाद चालू असतील खास करून तुमच्या वडिलांच्या संपत्ती बाबतचे तर त्याचे प्रश्न सुद्धा या महिन्यात सुटू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील. एकंदरीतच हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे. 

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुमच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील. कष्ट मात्र करावे लागतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठीही चांगला आहे. शीघ्र प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर व्यवसायाला गती मिळेल असा काही निर्णय तुम्ही घेऊ शकता. 

स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना सुद्धा लाभ होईल. एकंदरीतच तुमच्या जीवनामध्ये या महिन्यांमध्ये शांतता नांदेल असं म्हणायला हरकत नाही. फक्त काही कारणाने प्रिय व्यक्ती तुमच्यावर रागवेल पण तुम्ही थोडा संयम ठेवला तर सगळं काही ठीक होईल. 

तुम्ही पिठाचा चौमुखी दिवा लावा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर बुध ग्रहाचे पाठबळ मिळायचे असेल तर गणपती बाप्पाला दिवा लावा किंवा उपासना करा. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.