Skip to content

कुंभ रास- ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच…

  • by

नमस्कार मित्रांनो.

ऑगस्ट महिना कुंभ राशीसाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊया. मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना नक्कीच चांगला जाणार आहे. या महिन्यात नोकरदार लोकांना यश मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. कुटुंबातही प्रेम वाढेल. तुमचा सन्मानही वाढेल. लव लाईफ सुद्धा खूप चांगल असेल. 

प्रियसी सोबत लग्न करण्याचा निर्णय तुम्ही या महिन्यात घेऊ शकता. धनप्राप्तीचे सुद्धा योग आहेत. इतकेच नाही तर वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित काही वाद चालू असतील तर ते सुद्धा मिटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काळ तसा बरा आहे. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ कुंभ राशीसाठी नक्कीच चांगला जाणार आहे. कारण कार्यालयात पदोन्नतीचे योग आहेत. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुद्धा यश मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मात्र मिळू शकते.

तुमच्या कामावर आनंदी राहिल्याने या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते. महिन्याच्या पूर्वार्धात नोकरीचे नवीन मार्ग खुले होतील. 

तुम्हाला नोकरीसह चांगल्या नवीन ऑफर येतील. काही लोक या काळात नवीन व्यवसाय करण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. आणि नोकरी बदलण्याचा निर्णय घेताना साध्या साध्या गोष्टींचा गांभीर्याने विचार मात्र करा. वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या.

नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. या दरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सगळीकडे यश मिळणार आहे. व्यापार आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात नवीन प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील.

आर्थिक दृष्टिकोनातून कुंभ राशीसाठी हा काळ चांगला आहे. दुसऱ्या घरात बृहस्पती असल्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा येईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. या दरम्यान नवीन योजनातून सुद्धा पैसे येत राहतील. महिन्याच्या उत्तरार्धात सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मेहनतीचे फळ मिळेल.

शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने सुद्धा फायदा होईल. या दरम्यान शेअर बाजारातील चढउतारावर मात्र बारकाईने लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं या महिन्यात तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्ही बचत करू शकाल. तुम्ही नवीन जमीन घर खरेदी स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. 

आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर मात्र निष्काळजीपणा दाखवू नका. लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही मानसिक तणाव सुद्धा जाणवू शकतो. यादरम्यान तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा शेजारच्या लोकांशी वाद होऊ शकतात. आणि त्यामुळे  तुमचा तणाव अधिक वाढू शकतो. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो. थोडी सावधगिरी बाळगण गरजेच आहे. 

शत्रूंपासून अंतर ठेवण ही गरजेच आहे‌. योगधानामुळे मानसिक दबाव तुम्ही कमी करू शकता. निराशा आणि नैराश्य तुमच्यासाठी चांगल नाही हे लक्षात ठेवा. तुमच मन तुम्ही मित्रांजवळ मोकळ करू शकता.

जे जोडीदारांच्या शोधात आहेत त्यांची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. महिन्याच्या पूर्वार्धाचा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही दृढ निश्चय कराल आणि तुमच्या प्रियसीला जीवनसाथी बनवण्याचाही निर्णय घ्याल. प्रेम विवाहासाठी दोन्ही बाजूची संमती दिसून येईल. 

विवाहितांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. वैवाहिक जीवनात चांगले दिवस निर्माण होतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाच आयोजन केले जाऊ शकत. नातेवाईकांशी सुद्धा संबंध दृढ होतील. आणि सूर्य बुध संयोगामुळे पिता पुत्रांमध्ये प्रेम वाढेल.

या काळात वडीलधाऱ्यांचा स्नेह वाढेल भावंडांमध्ये संबंध सुधारतील. पिठाचा चार मुखी दिवा या महिन्यात तुम्ही लावावा. शनि देवांना मोहरीचे तेलही अर्पण करा. आणि शुक्रवारी मातेच्या मंदिरात जाऊन हार फुल अर्पण करा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *