Skip to content

गणपतीचे वाहन उंदीर कसे झाले? जाणून घ्या यामागील रंजक कथा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतो. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविल्यावर उंदरासाठी करंजी सुद्धा आपण ठेवतो. गणपती सारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल. याचा आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. एकदा इंद्र समारंभात गाणं गाण्यासाठी इंद्राने क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीने बोलावून केल. 

तेव्हा घाईघाईने इंद्र सभेत असता या क्रौंच गंधर्वाची लाथ  तिथेच बसलेल्या बामदेव नावाच्या महर्षीला बसली त्यामुळे बामदेव अतिशय संतापले त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला कि तू तुरुतुरु पळणारा उंदीर होशील. त्याच्या शापाने क्रौंच्याचे उंदरात परिवर्तन झाले. आणि उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. 

आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करायला सुरुवात केली. आश्रमाचे पदार्थ खाऊन त्यांनी आश्रमावासी आणि पराशर ऋषींना भंडावून सोडले. एवढंच नाही तर आश्रमातील ग्रंथ पोथ्या कपडेसुद्धा त्याने कुतरडून टाकली. आश्रमातील सार्‍या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. पण कोणाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननाची प्रार्थना केली. 

हे गजानना आम्हाला या त्रासापासून सोडव. गणपतीने मग तिथे प्रकट होऊन मूर्तीने आपला पाट त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करू लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितल. पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही ओसरला नव्हता.

त्याने गर्विष्ठपने गणपतीलाच म्हटल तुझ्याकडून मला कोणताही वर नको तूच माझ्याकडे वर माग. त्याचा हा उद्दामपणा पाहून गणपती लगेच म्हणाला बर आजपासुन तु माझे वाहन हो. आणि गणपती त्याच वेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदीर दीन झाला. आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला. 

आता हा पिटुकला उंदीर मामा गणपती बाप्पाचा वाहन का झाला हे सांगणाऱ्या आणखीनही बऱ्याच वेगवेगळ्या कथा आहेत. एका कथेनुसार भूषकराज नावाचा एक मोठा भयंकर आणि पराक्रमी राक्षस होता. त्या राक्षसाने पृथ्वीवर धुमाकूळ घातला होता. आणि त्या राक्षसाला गणपती बाप्पाने युद्धात हरवल. 

आणि मरताना मात्र त्याने वरदान मागितलं की त्याला गणपती बाप्पाचं वाहन होण्याचा मान द्यावा अशा आशयाच्या वेगवेगळ्या कथा तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतील. थोडक्यात काय पिटुकला उंदीर मामा गणपतीबाप्पाच वाहन झाला आहे खरं तसं पाहिलं तर आपल्या प्रत्येक देवतेचे वाहन कुठला ना कुठला तरी प्राणी आहे. 

आपली संस्कृती आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचच हे एक उत्तम उदाहरण आहे. निसर्गातील कुठलाही प्राणी पक्षी हा हीन नाही दिन नाही. त्याचा निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या कथांमधून केला जात असेल नाही का. 

तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही आणखीन अशी कुठली कथा ऐकली आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *