Skip to content

गणपती बसवताना “या” नियमांचे पालन व्हावे, नाहीतर होऊ शकतो मोठा अनर्थ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

गणेशोत्सवाची तयारी सगळीकडे चालू आहे. गणपती बसवताना काही नियमांचे पालन आपल्याकडं व्हायला हव. त्या नियमां बद्दल बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते. चला एकदा ते नियम काय आहेत ते ऐकूया. म्हणजे यंदाचे गणपती बसवताना आपल्याकडं त्या नियमांचे पालन होते की नाही. हे आपल्याला बघता येईल आणि गणपतीचे स्वागत योग्य प्रकारे करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. गणपती बाप्पांचे स्वागत प्रत्येकाच्या घरात केले जाते.

कुणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवसांसाठी येतात कोणाच्या घरी पाच दिवसांसाठी तर कुणाच्या घरी सात किंवा दहा दिवसांसाठी. दिवस कितीही असले तरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण तयार असण आणि गणेश उत्सवाची तयारी महिना महिना आधीपासून सुरू होते. पण त्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत.

त्यातला पहिला मुद्दा म्हणजे गणेश मूर्ती कशी असावी. चिकन माती किंवा शाळू माती यापासून बनवलेली गणेश मूर्ती आता मी असा शास्त्र वाधी आहे. अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे धर्मशास्त्र विरोधी तसेच पर्यावरणालाही घातक आहे.

मूर्तीची उंची अधिकाधिक १ ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा आणि आवड याप्रमाणे गणेश मूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्राचा मत गणेश मूर्ती पुजावी. गणेश मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तिथे थोडे तांदूळ ठेवावे. पूजे पूर्वीच्या पाठावर मूर्तीची स्थापना करायची असते त्यावर तांदूळ ठेवले जातात.

मूर्तीत गणपतीच आवाहन करून तिची पूजा केल्याने शक्ती निर्माण होते. शक्यतो गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषांनी इतरांसह जावे. गणपती बाप्पाची मूर्ती आणताना जी व्यक्तीमूर्ती पकडणार आहे मूर्ती धरणार आहे त्या व्यक्तीने पारंपारिक पोशाख करावा. आणि डोक्यावर टोपी नक्की घालावी.

मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख घरी आणणाऱ्या आणि पाठा समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागात सगुण तत्व तर पाठीच्या भागात निरहुन तत्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतिक आहे. त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्वाचा लाभ होतो. तर इतरांना निर्गुण तत्वाचा लाभ होतो.

श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करतच मूर्ती घरी आणावी. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे राहाव. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालाव. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. त्यानंतर मूर्तीचे औक्षण करूनच ती मूर्ती घरात आणावी. सजवलेल्या मकरास पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षदा घालून त्यावर मूर्ती ठेवावी.

सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी. मूर्तीला मकरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीच काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी. मूर्तीवर एखादा वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी. उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी.

मूर्तीचे मूख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावे. जेणेकरून पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तर नाही ना याची खात्री करून घ्यावी. पूजा करताना आपले मूक पूर्व उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी. दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते.

गणपतीची जी मूर्ती आपण आणतो ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते. म्हणूनच शक्यतो तिला दक्षिण मुखी ठेवणे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. पण यंदा गणपती बसवताना या गोष्टींचा विचार नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *