Skip to content

गणपती बाप्पाला मोरया बोलण्याचा अर्थ काय आहे?

  • by

पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आहे.

नमस्कार मित्रांनो.

महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे आपला लाडका बाप्पा ६४ कलांचा अधिपती कोणतही काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना आपण करत असतो. अनेकदा प्रवासाला निघताना सुद्धा किंवा मग चांगल्या कामाला सुरुवात करताना आपण गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत असतो. 

मंडळी पण गणपती बाप्पा असं म्हटल्यानंतर पुढे मोरया हा शब्द का येतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर गणपती बाप्पा मोरया शब्द कुठून जूळून आला यामागे तब्बल सहाशे वर्ष जुनी एक कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. 

ती अशी या गावांमध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक निश्‍चिम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून दूर ९५ किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले सतत ४२ दिवस तब करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतला. 

मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असं सांगितलं जातं की वयाच्या तब्बल ११७ व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. पण मग पुढे वयोमानानुसार त्यांना मंदिरात जाणं शक्य होत नव्हत. आपल्याला देवाचे दर्शन होत नाही या विचाराने मोरया गोसावी नेहमी दुःखी राहू लागले. मग बापाला तरी आपल्या भक्ताचे दुःख हे कसं पाहावे. 

मग एके दिवशी गणपती बाप्पा आले त्यांना स्वप्नात दर्शन घेऊन सांगितलं उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडा स्नान करत असताना पूजा करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये चक्क श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणपती बाप्पांनी स्वतः त्यांना दर्शन दिल होत. ते मग हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. 

काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिरात जवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखल जात. बाप्पाचे निसिम भक्त म्हणून मग मोरया गोसावी यांचं नाव गणेशाशी अशी अशाप्रकारे जोडल गेला आहे. 

लोक फक्त गणपती बाप्पा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया नक्कीच म्हणतात.  पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आहे. आणि मग पुढे देशभरात जगभरात गणपती बाप्पा मोरया म्हणून जाऊ लागल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.