Skip to content

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी गणपती बाप्पा घरी आल्यानंतर ही ७ कामे चुकूनही करू नका. घर बरबाद होईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. आपल्या घरी मुक्काम करतात. या दहा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक जण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो. आराधना करतो. गणपती बाप्पांनी प्रसन्न व्हावं आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाचीच मनोमन इच्छा असते. 

मित्रांनो अशा वेळी जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत. आपण आपल्या घरात काही नियमांचे पालन अगदी अत्यावश्यक रीतीने करायलाच हवं. जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही. मित्रांनो यातील पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट की गणेशमूर्ती स्थापन करताना ती अशा प्रकारे आपण स्थापन करावी की गणपतीची पाठ आपल्याला किंवा आपल्या घरातील कुणाही व्यक्तीला अजिबात दिसू नये. 

कारण गणपती बाप्पांच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास आहे. जर चुकून हुकून आपण या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतलं. किंवा या पाठी कडे जर आपली वारंवार दृष्टी पडत असेल तर त्यामुळे घरात अ लक्ष्मी म्हणजेच दरिद्रता गरिबी निर्माण होऊ शकते. 

मित्रांनो दुसरी गोष्ट या दहा दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची पूजा करताना किंवा आरती ओवाळताना काळ्या अगर निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करू नका. गणपती बाप्पांना लाल आणि पिवळा हे दोन रंग अतिशय प्रिय आहेत. या रंगांचे कपडे आपण परिधान करू शकता. मित्रांनो अनेकजण अनुदानाने अगदी नकळत तुळशीची पानं म्हणजे तुलसी पत्र गणपती बाप्पांना अर्पण करतात.

अशी चूक आपण करू नका. हिंदू धर्मशास्त्र अस मानत पौराणिक कथा अशी आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला तेव्हा गणपती बाप्पांनी नाराज होऊन त्यांना शाप दिला होता. थोडक्यात श्री गणेश आणि तुलसीमाता यांच्यामध्ये सख्ख्य नसल्याने तुळशीची पान आपण चुकूनही गणपती बाप्पांना अर्पण करू नका.

मित्रांनो गणपती बाप्पांना मंदार म्हणजेच रुईची पान अतिशय प्रिय आहेत. सोबतच त्यांना शमीची पानं सुद्धा अतिशय आवडतात ही पाने आपण त्यांना अर्पण करू शकता. मित्रांनो एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच कवाडे बंद करून आपण बाहेर जाऊ नका. 

म्हणजेच घराला लॉक करून कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई करत. आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत कमीत कमी एका व्यक्तीने तरी घरात सदैव या दहा दिवसांच्या कालावधीत उपस्थित राहायला हव. मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचा दर्शन घेणं हे निसिद्ध मानलेलं आहे. जी व्यक्ती या दिवशी चंद्र दर्शन करते चंद्राकडे पाहते त्या व्यक्तीवर कोणता ना कोणता खोटा नाटा आळ हा नक्की येतो. 

जो गुन्हा त्या व्यक्तीने केलेला नाही अशा गुन्ह्यांमध्ये ती व्यक्ती अडकते. आणि म्हणून चंद्र दर्शन या दिवशी कलंक आपल्या माती लावू शकत. म्हणून ते निश्चित आहे. मित्रांनो आपण गणपती बाप्पांची पूजा या दहा दिवसात करत आहोत. तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे मांसाहाराचा सेवन केलं जाणार नाही मांसाहार शिजवला जाणार नाही याची ही आपण काळजी घ्या. 

आपल जे जेवण असेल आपला जो आहार असेल तो सातवीक असायला हवा. सोबतच आपण कोणत्याही प्रकारची व्यसन मग दारू असेल सिगारेट असेल तंबाखू असेल या व्यसनांपासून सुद्धा या १० दिवसांच्या कालावधीत दूर राहायला हव. मित्रांनो खोटे बोलणे चोरी करणे किंवा वादविवाद करणे घरात एकमेकांशी मोठमोठ्याने भांडणे या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात. 

आणि म्हणून या गोष्टींपासून सुद्धा आपण शक्यतोवर लांब राहाव. अनेक जण तर लसूण आणि कांदा सुद्धा या 10 दिवसात खात नाहीत. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही याही नियमाचे पालन करू शकता. अनेक जण आपल्या घरात जे काही शिजवलं जातं जे काही अन्न तयार होतं तर त्याचा पहिला भोग नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवतात आणि मगच ते पदार्थ ते स्वतः सेवन करतात. 

आपण सुद्धा या नियमाचे पालन करू शकता. मित्रांनो या दहा दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारे जुगार खेळणं सट्टा खेळणं या गोष्टी सुद्धा आपण करू नयेत. अन्यथा माता लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 

मित्रांनो या दहा दिवसांच्या कालावधीत आपण सातत्याने सकारात्मक विचार करावा. पॉझिटिव्ह राहाव कोणत्याही प्रकारे वाईट भाषेचा वापर किंवा शिव्या शाप देण या गोष्टींपासून आपण दूर राहा मनशांत ठेवा. आणि गणपती बाप्पांचं आपण ध्यान करू शकता गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जप करू शकता. 

तर मित्रांनो या काही नियमांचे पालन गणपती आपल्या घरात आल्यानंतर आपण नक्की करा. गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत धन्यवाद ओम नमो नारायणा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *