Skip to content

घरात झुरळांची संख्या वाढली आहे…? तर मग घ्या फक्त एक चमचा साखर आणि करा हा उपाय…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या घरात अनेक लहान जीव असतात, मुंग्या, झुरळं, उंदीर शिवाय पाल यांसारखे अनेक जीव असतात. यांचा सहसा त्रास काही नसतो मात्र यांची संख्या वाढली तर घरात अनेक वस्तूंची नासाडी होते. त्यामुळे घरातील सर्व स्त्रिया खूप त्रस्त होतात, धान्याची नासाडी होत असते.

जेवणाच्या भांड्यावर ते फिरत असतात तसेच कपडे देखील खराब करतात त्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात. खूप प्रयत्न करूनही हे प्राणी किंवा खास करून घरातील झुरळे बाहेर पडत नाहीत. अनेक प्रकारची औषध वापरून देखील काहीच उपयोग होत नाही.

मात्र मित्रहो आपण ही औषधे वापरतो याचा या झुरळांवर तर काही परिणाम होत नाही पण घरातील लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. चुकून त्यांनी जर ते औषध खाल्ले तर खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला घरगुती उपाय करणे सोयीस्कर होईल. 

मित्रहो हा लेख अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला देखील हा उपाय पूर्ण कळेल व घरातील झुरळे बाहेर घालवण्यास तुम्हाला मदत होईल. मित्रहो हा उपाय खूपच सोपा आणि फायदेशीर आहे त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील येणार नाही.

हा उपाय करण्यासाठी मित्रहो आपल्याला फक्त एक चमचाभर साखर लागणार आहे. तसेच या साखरे सोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बेकिंग सोडा. मित्रहो एका वाटी मध्ये आपण एक चमचाभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे.

 त्यामध्ये आपण एक चमचाभर साखर घ्यायची आहे. बेकिंग सोडा आणि साखर हे एकत्र मिसळून त्यांचे योग्य मिश्रण तयार करायचे आहे. हे मिश्रण नंतर खलबत्ता घेऊन त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यामुळे हे अगदी बारीक उत्तम मिश्रण बनेल. 

सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट मध्ये असणारा घटक झुरळांसाठी अत्यंत घातक असतो, हा घटक साखरेत व्यवस्थित घुसळण्यासाठी योग्य पध्दतीने कुटून घ्यायचे आहे. अगदी उशिरापर्यंत हे मिश्रण एकत्र करावे, त्यानंतर हे मिश्रण पुन्हा वाटीमध्ये काढून घ्यावे. 

तसेच नंतर हे मिश्रण एका कागदाचे काढून घ्यावे. त्या कागदावर चार ते पाच ठिकाणी हे मिश्रण थोडे थोडे ठेवावे. तसेच घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्त झुरळे आढळतात त्या त्या ठिकाणी हा कागद फाडून ठेवावा. मित्रहो या मिश्रणात साखर असल्याने झुरळं या कडे आकर्षित होतात व हे मिश्रण खातात. 

सोडियम बायकार्बोनेट मुळे झुरळांच्या पोटात आग पडते, त्यामुळे ते खूप तडफडतात व त्यामुळे ते मरून जातात. हा उपाय केल्याने झुरळांपासून नक्कीच तुमची सुटका होईल, शिवाय घरातील लहान मुलांना देखील याचा त्रास होणार नाही. निष्काळजीपणे तुम्हाला हा उपाय करता येईल. 

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *