Skip to content

चातुर्मास झाला सुर चुकूनही करू नका ही १ गोष्ट. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा करावा लागेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आषाढी एकादशी पासून सुरू होतो चातुर्मास. या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे चातुर्मासात अनेक गोष्टी आवर्जून करायला सांगितल्या जातात तर अशाही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वर्ज मानल्या जातात. अशा या चातुर्मासामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी आपण चुकूनही करू नये. 

अस आपल्या शास्त्र सांगत‌. कोणती आहे ती गोष्ट आणि केली तर काय होतं चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया.

मंडळी चातुर्मास हा काळ ईश्वराची आराधना उपासना करण्यासाठी मानला जातो. या काळामध्ये सात्विक भोजन करावं असंही सांगितलं जात. या काळामध्ये अनेक व्रतवैकल्य सुद्धा येतात. 

त्या व्रतवैकल्यामध्ये आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहणं आवश्यक असतं. आणि या सगळ्याचाच भाग म्हणून एक गोष्ट आहे जी करणे चातुर्मासामध्ये वर्ज मानले जाते. ती म्हणजे कांदा आणि लसूण हे पदार्थ चातुर्मासामध्ये चुकूनही खाऊ नये. 

का खाऊ नयेत तर कांदा आणि लसूण हे पदार्थ शरीरात वासना आणि विकारांना वाढवून बुद्धीची ग्रहणाचा संस्था कमी करतात. चातुर्मासात मध्ये अनेक सण व्रतवैकल्ये केली जातात त्यामुळे या काळात मुळातच सातवीक आहार घेणं अपेक्षित आहे. 

आणि हे पदार्थ खाल्ले की सत्वगुण नष्ट होऊन रज आणि तम गुणांमध्ये वाढ होते. तोंडाचा वास येतो. कांदा लसूण खाल्ल्यावर शरीराचा येणारा दुर्गंध लक्षात घेता सात्विक दैवता आपल्या मध्ये वास करणं अवघड होऊन जातं. त्यामुळे अनुष्ठानची फलप्राप्ती होणे सुद्धा अजूनच अवघड असत. 

म्हणून चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाणे वर्ज्य मानले जाते. आयुर्वेद सुद्धा सांगतो आपल्या शरीरात तीन गुण असतात. यातला तम गून हा स्थिती दर्शक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तम जास्त असतो. तो माणूस आहे त्या स्थितीतच राहतो. काही कष्ट करावं काही काम करावं आयुष्यात यश मिळवावं असं काहीही त्या माणसाकडून केलं जात नाही. 

तम गून वाढवणार अन्न आपल्या शरीरात अज्ञान आणि अंधार सुद्धा वाढवतं. अशी जुनी समजूत आहे. कांदा लसूण हे दोन्ही तामसक आहेत. म्हणून कांदा लसूण खाऊ नये अशी धार्मिक पद्धत आहे. कांदा आणि लसूण खाऊ नये यामागे आणखी एक धार्मिक कारणही आहे.

पुराणानुसार कांदा आणि लसून कसे निर्माण झाले याची कथा आहे. या कथेत असं म्हटलं आहे की अमृत मंथनानंतर जेव्हा अमृताचं वाटत होतं त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतलं होत. सगळ्यात आधी देवांना अमृत दिलं आणि हे मोहिनीचे रूप घेऊन भगवान देवांना अमृत देत होते.आणि राक्षसांची दिशाभूल करत होते. 

राहूच्या हे लक्षात आलं म्हणून तो अवतार बदलून देवांमध्ये जाऊन बसला. राहुल च रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसणं हे सूर्य आणि चंद्राच्या लक्षात आले. त्यांनी हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या लक्षात आणून दिलं. मग विष्णूना राहूचा राग आला आणि त्यांनी आपलं सुदर्शन चक्र राहू कडे सोडलं. चक्राणे राहुच डोकं उडवल. 

त्यावेळी राहूच्या रक्ताचं काही थेंब धरतीवर ठेवले आणि त्यातून कांदा आणि लसणाची निर्मिती झाली. असं कथेमध्ये सांगण्यात आला आहे.राहू हा असुर होता तर त्याच्या रक्तापासून निर्माण झालेले कांदा आणि लसूण खाऊ नये असे या कथेनुसार मानण्यात येत. 

असुराच्या रक्तापासून जरी कांदा लसूण निर्माण झाला असेल तरी ते रक्त साधसुध नव्हतं . तर त्यामध्ये अमृताचे थेंब होते. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने कांदा लसूण न उपयुक्त ठरतात काही शंकाच नाही. कांदा हा लसणी पेक्षा थोडासा सौम्य आहे. दोघांचेही गुणधर्म सारखेच आहेत.

कांद्याचे शास्त्रीय आणि मानसिक दृष्ट्या प्रयोग झालेले आहेत. कांदा सोलत गेल्यावर शेवटी आत राहणारा कोण हा मनोव्यापार चालवणारा असतो. म्हणून कांद्याला मदन म्हटलं गेलेला आहे. तो विषय वासना वाढवतो. चातुर्मासाच्या या काळात पावसाळा असल्याकारणाने एकूणच पचनशक्ती मंदावलेली असते. 

त्यामुळे या काळात कमी आणि हलकं तसेच पचायला सहज सोपा आहार घ्यावा असे सांगितले गेलेला आहे. आणि त्यामुळे कांदा आणि लसूण चातुर्मासात वर्ज्य आहे. मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड असतात. पचनशक्ती मंद झाल्यामुळे तळलेले मसालेदार पदार्थ खाण आरोग्यासाठी चांगल नाही. 

म्हणून पूर्वजांनी चतुर मासाच्या चार महिन्यांच्या काळामध्ये कांदा लसूण खाऊ नका असे सांगितले. त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातील पहिली नववी कांदा नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी कांद्याची भजी करून तुम्ही मनसोक्त खा कारण कांद्याचा विपुल प्रमाणात वापर करा. 

असेही सांगितल आहे. नंतर मात्र कांदा खाऊ नका. त्यासाठीची आधीही सोय सांगितली आहे. त्याचबरोबर माणसहार सुद्धा पचायला जड असतो त्यामुळे त्याचेही सेवन चातुर्मासामध्ये करू नये. असं आवर्जून सांगितलं गेलेलं आहे. मग मंडळी तुम्ही चतुर्मासामध्ये कांदा लसूण खाता की नाही आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *