नमस्कार मित्रांनो.
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा याचा व्यक्तीच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्थितीवर चांगला किंवा वाईट परिणाम होतोच. बऱ्याच लोकांच्या घरात मर्यादित जागा असल्याने त्या जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी कायम पायऱ्यांखाली काही गोष्टींची साठवण केली जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पायऱ्याखाली ठेवण चुकीच मानल जात. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊयात.
१) मंदिराचे बांधकाम- तुमच्या घरातील मंदिर कधीही पायऱ्यांखाली बांधू नये अस वास्तुशास्त्र सांगत. स्वतःप्रमाणे देवालाही स्वतःसाठी जागा आवश्यक आहे आणि देवाच्या निवासासाठी जीना ही एक आदर्श जागा मानली जात नाही. म्हणून मंदिराला वेगळ्या कोपऱ्यात द्यावा.
२) लॉकर- लॉकरचा थेट परिणाम देवी लक्ष्मीशी आहे आणि जर हे लॉकर तुम्ही जिन्याखाली ठेवले तर हा देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारख होईल. लॉकर मध्ये आपण दागिने, पैसे किंवा महत्त्वाचे दस्तावेज ठेवत असतो. मात्र धन किंवा दागिने यात साठवण आणि त्यावरच्या पायऱ्यांवरून वरच्या मजल्यात निघून जाण म्हणजेच देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारख होत.
३) सतत गळणारा नळ- वास्तुशास्त्रानुसार पायऱ्याखाली स्नानगृह बांधणे योग्य मानले जात नाही. जर तुमच्याकडे पुरेशी जागा नसेल तर तुम्ही या ठिकाणी बांधकाम टाळावे. याशिवाय जागेच्या कमतरतेमुळे बांधकाम करावे
लागत असल्यास कोणत्याही नळातून गळती होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यायला हवी.
४)डस्टबिन, कचरापेटी- तुमच्याकडे असलेल्या जिन्याची प्रत्येक पायरी तुम्ही साफ करायला हवी आणि त्याखाली डस्टबिन सुद्धा ठेवू नये.जिन्याखाली डस्टबिन ठेवल्याने नकारात्मक येते असे म्हणतात.
५) चपला बूट रॅक – पायऱ्या खाली बूट आणि चपला कधीच ठेवू नये. एक शु रॅक तयार करून ती सतत घराबाहेर ठेवावी आणि त्यात चपला ठेवावे. मात्र ही शू रॅक जिन्याखाली ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मकता पसरू शकते. ज्यामुळे घरगुती तणावही निर्माण होऊ शकतो.