नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तुमच्या गच्चीवर अंगणात किंवा दारात किंवा गॅलरीत जर गोकर्णची वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णच्या फुलांची वेल लावणार असाल तर नक्की ऐका. खरंतर झाडं ही नुकतं पर्यावरण शुद्ध करत नाहीत तर त्यांचा आपल्या जीवनावर फार खोल परिणाम होत असतो.
शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडे लावल्याने ऊर्जा मिळते. सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजता असेही म्हणतात. या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुले येतात.
फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात.निळ्या रंगाचे फुल भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. गोकर्णच्या वेळेला वेंत वेल असेही म्हणतात. शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते.
त्यासोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा वाढते असेही म्हणतात. शनि देवांच्या पूजेमध्ये गोकर्णची फुले अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असते. किंवा ज्यांना शनीदोष असेल त्यांनी शनि देवांना जर शनिवारी गोकर्णची निळी फुले अर्पण करावी.
त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल. आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेल लावायला हवी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशेला या दिशेला गोकर्णची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात.
या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात. कोणत्या दिवशी लावायला हवी. अर्थातच याला विष्णू क्रिया असं म्हटलं जातं. त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळं गोकर्ण लावू शकता.
ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदा होईल. आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. मग मंडळी तुमच्याकडे या निळ्या गोकर्णची वेल आहे का? त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे. सांगायला विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.