Skip to content

तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ही एक चूक अजिबात करू नका.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ही एक चूक अजिबातच करू नका. मित्रांनो भरपूर भक्तांचा स्वामी सेवेकरी यांचा एक प्रश्न सारखा विचारला जात होता. तो म्हणजे आमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. आणि आम्ही त्यांना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात तशीच ठेवून दिली आहे. 

आणि इतर देवानप्रमाणे आम्ही तिची पूजा अर्चना करत आहे. तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक असते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही अन्य देवासारखी ठेवली जात नाही. तिला ठेवण्याची एक विशेष पद्धत असते. तर त्या पद्धतीनुसार तुम्ही त्या मूर्तीला घरात स्थापन करायला पाहिजे. 

मित्रांनो जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती विकत घेता. तेव्हा तिच्याबरोबर एक वाटी सुद्धा विकत घ्यायची असते. छोटीशी वाटी असते ज्यामध्ये अन्नपूर्णा माता ठेवली जाते बसवता येते अशी एक वाटी असते. किंवा तुमचे वाटी तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही घरातूनच एखादी छोटीशी वाटी किंवा ताटली घेऊन त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करू शकता. 

आता ही कशी स्थापन करावी. तर याचीही खूप सोपी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही त्या वाटीमध्ये किंवा त्या ताटलीमध्ये तांदूळ फुल भरून घ्या म्हणजे पूर्ण तांदूळ त्यामध्ये भरून घ्या. सपाट करून घ्या. आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा. आणि ते देवघरात स्थापन करा. 

कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही धनाची नाही धान्याची देवी आहे. म्हणून धान्याच्या देवीला धान्यांमध्येच ठेवले जाते. म्हणून तांदळामध्ये त्या देवीला ठेवण्याची पद्धत प्रक्रिया असते. आणि त्यानुसारच आपण त्या देवीची पूजा करावी. आता विशेष प्रश्न येतो तो म्हणजे ते तांदुळ जेव्हा आपण ठेवतो ते केव्हा बदलावे.

मित्रानो ते तांदूळ काही लोक एक दिवसाआड बदलतात. म्हणजे आज ठेवले तर उद्या नाही बदलले परवा बदलतील काही लोक रोज बदलतात. काही उद्या बदलतील उद्या पुन्हा नवीन ठेवतील असं करतात. आणि काही लोक हे दर आठवड्याला ते तांदूळ बदलतात. म्हणजे जर तुम्ही सोमवारी ते वाटीत तांदूळ ठेवलेले आहेत.

तर पुढच्या सोमवारी दुसरे तांदूळ ठेवतात आणि ते वाटीतले तांदूळ पक्षांना आपण खाऊ घालू शकतो किंवा पक्षांना टाकू शकतो. तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही या पद्धतीने तिची स्थापना आपल्या घरात करू शकता. तर मित्राने माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे विचारा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *