Skip to content

तुम्हाला तुमच कुलदैवत माहीत नसल्यास ‘हे’ करा. अशी करा पूजा होईल धनलाभ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो बऱ्याच लोकांना कुलदेवता माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहिती नसेल. आपल्याला कुलदेवता कुलदेवता माहिती नसेल आणि कुलदेवतेची पूजा आपल्या घरात होत नसेल. तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात असा अनुभव तुम्हालाही येतोय का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कुलदेवता माहिती नसल्यास काय कराव. याबद्दल माहिती सविस्तर चला जाणून घेऊयात.

नित्यनियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्याची रोज पूजा करायला हवी. ज्यामुळे घरातील भरपूर अडथळे दूर होतात समस्या संपतात आणि घरात वादविवाद होत नाहीत अस म्हणतात. शिवाय प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंजा, वास्तू, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यनंतर कुलदेवतेला जाण हा महत्त्वाचा भाग मांडला जातो. पण काहींना आपली कुलदेवतच माहिती नसेल अशा वेळेस काय कराव हा मोठा प्रश्न असतो.

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपली कुलदैवत कुठे आहे? त्याचे महत्त्व काय आहे? कुलदेवता संबंधित आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरीत राहतात. कधी नातेवाईकांकडून अर्धवट माहिती मिळते तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपले जेष्ठ ही आपल्याबरोबर नसतात आणि मग घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते. हा भरपूर लोकांना अनुभव आलेला असेल.

आता कुलदेवता म्हणजे काय हो कुलदेवता हा शब्द “कुळ आणि देवता” या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे ती आपली कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती त्रिदेवता असते कुलदेवी म्हणून संबोधले जाते.

जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती नसेल आणि ते तुम्हाला माहिती करून घ्यायच असेल तर त्याचे दोन नियम नक्की पाळा. रोज सकाळी आणि संध्याकाळी “स्त्री कुलदेवताय नमः आणि श्री कुलदेवताय नमः” या मंत्राचा जप करावा. एक माळ जप रोज करा. अस म्हणतात काही दिवसातच काहीतरी घटना घडवून आपल्याला आपली कुलदेवता माहिती होईल. मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल.

कारण अस म्हणतात रोज हा जप आपण मनोभावे करता खऱ्या श्रद्धेने करता. तेव्हा कोणीतरी ज्येष्ठ मंडळी तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेव कोण आहे हे सांगून जात. स्वप्नात कुलदेवतांचा साक्षात्कार ही होऊ शकतो अशी श्रद्धा आहे. तुम्ही हा अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही. जर तुमची श्रद्धा त्रिदेवावर असेल म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव किंवा आदिमायावर असेल तर त्याची तुम्ही भक्ती करा.

त्यांची सेवा करावी त्यांच्या नामाचा जप करावा यामुळे सुद्धा आपली सेवा कुलदेवताला लागते अशी सुद्धा मान्यता आहे. तुम्हाला कुलदैवत माहिती असेल व या मार्गातून माहिती झालच तर वर्षातून एक वेळेस तरी आपल्या कुलदेवाचा तर दर्शन नक्की घ्यावा यामुळे घरात शांती सुख समृद्धी रहाते आणि समस्या ही दूर राहतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *