नमस्कार मित्रांनो.
मंडळी घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. वास्तू नुसार घरातील प्रत्येक वस्तू ऊर्जा निर्माण करते. वास्तुशास्त्रानुसार ही ऊर्जा दोन भागात विभागणी गेलेले आहे. एक सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा. आज आपण नकारात्मक ऊर्जेबद्दल जाणून घेणार आहोत.
कोणत्या गोष्टीमुळे कशी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्याचा काय परिणाम होतो. हे देखील जाणून घेणार आहोत. ज्या जुन्या गोष्टी वापरात नसतात किंवा खराब होतात त्यातून एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जी तुमच्या आणि तुमच्या घराच्या सुख-समृद्धीला बाधा बनते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच वस्तू ज्या घरातून त्वरित काढून टाकल्या पाहिजेत.
१) जुनी वर्तमानपत्र- काही लोकांना जुनी वर्तमानपत्र गोळा करण्याची आवड असते. ती त्यांच्या घरात साठीच जातात. वास्तूमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते.आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तीची भीती असते. या सर्व गोष्टीमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते. त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा.
२) कुलूप- वास्तुशास्त्रानुसार विज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे लॉक वापरात येत नाही. किंवा खराब झाले आहे ते त्वरित काढले पाहिजे.असे म्हणतात की खराब कुलूप सुद्धा मार्ग बंदिस्त करते आणि यामुळे मार्ग देखील बंद होतो.
३) बंद घड्याळ- एका बाजूला चालू असलेले घड्याळ जे जीवनाचे कालचक्र दर्शविते, तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळे आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात. घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहिजे.असे मानले जाते की बंद घड्याळे तुमचा वेळ चांगला जाऊ देत नाहीत. आणि जीवनातील आनंदात अडथळा निर्माण करतात.
४) खराब बूट आणि चप्पल- ज्योतिष शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात खराब झालेले बूटआणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते. शास्त्रानुसार घरात खराब बूट ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शविते, जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील असतील तरी ही जे आहेत ते भाग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत. शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यावेत. यामुळे शनीची अशुभदशा देखील कमी होते.
५) जुने व फाटलेले कपडे- वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दिसते. चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत. असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकीर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.