Skip to content

दिनांक ३ मे अक्षय तृतीया या राशींचे नशीब चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया ला विशेष महत्व प्राप्त आहे. बरेच लोक या दिवसाची वाट पाहत असतात किंवा ज्यांना कुणाला खरेदी वगैरे करायची असेल लोक मुद्दाम अक्षय तृतीयेची वाट पाहतात. उत्साहाने त्या दिवशीच खरेदी करतात. या दिवसाला सर्वसिद्धी मुहूर्तानुसार विशेष महत्व प्राप्त आहे.

कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस उत्तम फलदायी मानला जातो या वेळी आपल्याला जर ग्रह प्रवेश करायचा असेल. किंवा विवाह असो गृहप्रवेश असो जमीन खरेदी करणे असो वस्त्र भूषण सोने-चांदी अशा प्रकारची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा कोणतेही शुभकार्य आपल्याला करायचे असेल तर अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.

मान्यता आहे की या दिवशी पितरांच्या नावे देखील पिंडदान केले जाते. या दिवशी पितरांच्या नावे पिंड दान केल्याने कोणतेही दान जर आपण या दिवशी केले तर अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे विशेष फळ प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते.

मान्यता आहे की या दिवशी जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर पूजा केली. तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. अशी मान्यता आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. 

कोणतेही जर आपल्याला शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची किंवा पंचांग पाहण्याची बिलकूल आवश्यकता नाही. आपण कोणतेही शुभ काम या दिवशी करू शकता. मुहूर्त पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही.

मित्रांनो मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. असे म्हणतात की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जी वस्तू आपण खरेदी करतो ती आयुष्यभर आपल्या बरोबर राहते. म्हणजे जीवन भर ती वस्तू आपल्याबरोबर असते. अक्षय तृतीयेला खरेदी करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते.

वैशाख शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक ३ मे रोजी मंगळवार अक्षय तृतीया आहे. मित्रांनो या वेळी अक्षय तृतीयेला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनणार आहे. या वेळी येणारी अक्षय तृतीया विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी अक्षय तृतीयेला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. 

पूजापाठ मुहूर्त आपल्याला जर अक्षय तृतीयेला पूजा करायची असेल तर पूजेचा मुहूर्त आहे दिनांक तीन मे रोजी सकाळी ०५:३९ पासून मुहूर्ताला सुरुवात होणार असून दिनांक ४ मे रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पर्यंत मुहूर्त राहणार आहे. या कालावधीत पूजा करणे शुभ मानले जाते. 

अक्षय तृतीयेचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. या राशींच्या जीवनावर अक्षय तृतीयेचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अतिशय लाभकारी घडण्याची शक्यता आहे.

 अक्षय तृतीया पासून पुढे यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता सुख समृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. 

एक सुंदर प्रगती एक अतिशय छान प्रगती आपल्या जीवनात येणार आहे. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर अक्षय तृतीयेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जीवनात चालू असलेला वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ सकाळची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. पैशांची अडचण पैशाची तंगी आपल्या जीवनात जी काही पैशाची तंगी चालू आहे ती आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. 

आता आपल्या जीवनात आर्थिक लाभ आपल्याला होणार आहे. धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची अडचण पूर्णपणे दूर होणार आहे. 

परिवारा तुझं काही अडचणी चालू असतील समस्या चालू असतील किंवा जर काही वैयक्तिक समस्या असतील तर त्या आता या काळात समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामासाठी सुद्धा दिवस शुभ फलदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर अक्षय तृतीयेचा अशी अतिशय शुभ प्रभाव आता दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. अक्षय तृतीया पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात जी दुःखाची अंधारी रात्र चालू आहे. ती आता समाप्त होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.

करियर मध्ये देखील आता मोठे यश प्राप्त होणार आहे. करियर मध्ये ज्या सारख्या अडचणी येत होत्या किंवा करियर मध्ये जे सारखे प्रश्न निर्माण होत होते. काय करावे किंवा कोणता निर्णय घ्यावा हे जर आपल्याला समजत नव्हते. इथून पुढे आपल्याला एक सकारात्मक चालना आपल्या बुद्धिमत्तेला मिळणार आहे.

इथून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाची वाटचाल होणार आहे. सकारात्मक विचार आपल्याला प्राप्त होतील. व्यापारातून देखील आपल्याला मोठा लाभ प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. नोकरीत आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. 

नोकरीमध्ये उत्तम यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सोबतच संसारी जीवनात सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती या काळात आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रात देखील उत्तम यश आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो काल विशेष अनुकूल असला तरी या काळात आपल्याला थोडे सावध राहण्याची शक्यता आहे.

या काळात वाईट लोकांपासून आपल्याला दूर राहावे लागेल. हमेशा आपण जसे लोकांसोबत वागता तर तसे भोळेपणाने न वाकता आता आपल्याला थोडेसे हुशारीने वागणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो व्यक्तीला पारखूनच त्याच्यासोबत व्यवहार करण्यासाठी आपल्याला निर्णय घेतला पाहिजे.

सिंह राशि- अक्षय तृतीयेचा अतिशय सकारात्मक प्रभाव सिंह राशि वर दिसून येईल. सिंह राशि साठी काय विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. 

सुख-समृद्धी मध्ये देखील वाढ होणार आहे. पण आपल्या स्वभाव मध्ये आपल्याला आता बदल करून घ्यावा लागणार आहे. मित्रांनो आपला जो कडक स्वभाव आहे तो आता आपल्याला शितल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाशी प्रेम आपुलकी माया ममतेने वागण्याचे आवश्यकता आहे. आणि गोडीगुलाबीने कामे करून घ्यावी लागतील. 

जेवढे जास्त आपण कामे गोडीगुलाबीने करून घ्याल तेवढा चांगला लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात देखील अडलेली कामे आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सांसारिक जीवनात चालू असणाऱ्या अडचणी किंवा जो मानसिक ताण-तणाव चालू आहे तो तनाव आता दूर होणार आहे.

या काळात भाग्य आपल्याला प्रचंड साथ देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्याला येऊ शकतात. कार्यक्षेत्रातून धनलाभाचे योग जुळुन येण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल खेळणार आहे.नोकरीत अधिकारीवर्ग आपल्यावर प्रसन्न असेल.

कन्या राशि- कन्या राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. मित्रांनो मागील काळात जो आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला आहे. मागील काळात एखादे मोठे दुःख देखील आपल्याला पचवावे लागेले असणार. पण आता परिस्थिती अतिशय सकारात्मक बनत आहे. कार्यक्षेत्रातील कामांना आता गती प्राप्त होईल.

मागील काळात उद्योगधंद्यांमध्ये जे नुकसान आपले झाले आहे. ते आता येणाऱ्या काळात भरून निघेल. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक साधने देखील आपल्याला प्राप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. 

आता इथून पुढे राजकीय क्षेत्रात देखील आपल्या नावलौकिकात वाढ होणार आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते.

तूळ राशी- तूळ राशी वर अक्षय तृतीयेचा शुभ प्रभाव दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. मागील काळात जर काही आर्थिक नुकसान झालेले असेल तर येणार्‍या काळात ते भरून निघण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. 

ज्या दिशेला व्यापार कराल त्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची अडचण. मागील काळात ज्या काही आपल्या जीवनात पैशाच्या अडचणी तयार झाल्या होत्या त्या आता दूर होणार आहेत. कुठून ना कुठून तरी अडचण भागणार आहे.

आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहील. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा आता चांगली सुधारणा घडून येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला सुद्धा चालना प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. एखादी चांगली नोकरी मिळू शकते किंवा नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रेम जीवनासाठी देखील काळ अनुकूल ठरणारा आहे.

कुंभ राशी- अक्षय तृतीयेचा अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात वारंवार अडचणी ज्या येत होत्या ते आता कमी होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो या काळात आपल्या स्वभावामध्ये थोडेसे बदल करावे लागतील.

एक तर आपल्याला व्यसनापासून दूर रहावे लागेल. त्यासोबतच जो चिडखोरपणा किंवा जो मानसिक ताण-तणाव आपल्याला होतो. आणि त्यामधून चिडचिड निर्माण होते. यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. मन अतिशय शांत ठेवावे लागेल. बुद्धी आणि विवेकाचा वापर करून कामे करून घ्यावी लागतील. 

नोकरीत आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. प्रगतीच्या अनेक संधी देखील आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आलेल्या संधीपासून लाभ आपल्याला प्राप्त करून घेतला पाहिजे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.