Skip to content

दिवाळीत या प्राण्यांचे दर्शन घडले तर भाग्योदय. अचानक चमकून उठेल तुमचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

दिवाळीच्या ४-५ दिवसांमध्ये जर तुम्हाला या प्राण्यांचं दर्शन घडलं तर समजा तुम्हाला लाभच लाभ होणार आहे. पण कोणते आहेत ते प्राणी चला जाणून घेऊया. त्यामध्ये  सगळ्यात पहिली गोमाता, गोमातेचे दर्शन एरवी सुद्धा पुण्यकारक मानले जाते. वाटेने जाताना जर गाय दिसली तर आपण तिला पटकन नमस्कार करून मगच पुढे जातो. 

वसुबारस हा गाय वासराचा सण आहे. वसुबारसेला पांढरीशुभ्र गाय दिसणे हे भाग्याचे लक्षण आहे. पांढरा शुभ्र रंग हा वैभव वाचन प्रसिद्धीच तसेच प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे पांढऱ्या गोमातेच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी मिळण्याची संधी भविष्यात प्राप्त होऊ शकते. घुबडाचे दर्शन मिळणे सुद्धा दुर्मिळच, घुबडाच्या दिसण्याबद्दल आवाजाबद्दल अनेक गैरसमज आहेत.

परंतु लक्ष्मी मातेने त्याला वाहन म्हणून स्वीकारल्यामुळे त्याच लक्षण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलं तर ही लक्ष्मी हा जन्माची वरती आहे. म्हणून लक्ष्मीपूजना दिवशी जर तुम्हाला घुबड दिसल तर लक्ष्मी तुमच्या घरी येणार हे नक्कीच. त्याबरोबरच पाल पाहिली तर अनेकांना शिसारी येते. कोणी तिला काठीने हकलतात तर कोणी तिला थेट लाठीमार करतात. 

तिच्या करड्या रंगामुळे ती डोळ्यांना सोसवत नाही. परंतु ईश्वरानेच प्रत्येकाला काही ना काही कारणाने केले आहे. त्यामुळे सृष्टीचक्रातील त्यांची भूमिका ओळखून त्यांना तात्पुरत बाहेर काढा. पण शक्यतो मारण्याचे पाप करू नका.

लोकमान्यतेनुसार दिवाळीत पालीचे दिसणं सुद्धा शुभ मानले जाते. 

घरातील एखादी मांजर वगळता परिसरातील एखादी मांजर तुमच्या घराजवळ गस्त घालत असेल तर हे सुद्धा समृद्धीचे लक्षण मानलं जात. रस्त्याने सुद्धा आपल्याला मांजरी दिसतात पण त्या आपल्याला आडव्या जाऊ नयेत म्हणून आपण पावलांची गती वाढवत ती आडवी जाण्या अगोदरच आपण तिला आडवे जातो.

त्यामुळे आपल काम झाल असल तरी त्या बिचारीचे काम राहिला असेल हे कोणी सांगावे. म्हणून तिला हाकलून न देता वाटीभर दूध घाला. तुम्हाला दूध दूध प्यायची कमतरता कधीच भासणार नाही. कुत्रा दिसला की भीतीने आपण पळ काढतो. असे पाहता आपण त्यांच्या वाट्याला गेले नाही तर ते प्राणी आपल्याला काहीच त्रास देत नाहीत. 

परंतु अकारण भीती मनात बसल्यामुळे आपण अनेक प्राण्यांबद्दल नकारात्मक भावना करून ठेवलेल्या आहेत. दत्तगुरूंच्या पायाशी असणारी चार कुत्री चार वेद मानली जातात. माणसापेक्षाही जास्त एकनिष्ठ असणाऱ्या या मुक्या प्राण्यांवर उगीच हात न उभारता लक्ष्मी पूजेच्या रात्री त्यांना भाकरी पोळी बिस्कीट खाऊ घाला. 

आपल्या संस्कृतीने प्रत्येक जीवाचा सन्मान करा. असच सांगितलेल आहे. जर आपण कोणावर दया केली तर ईश्वराच्या पात्रतेला आपण पात्र ठरतो. म्हणूनच मंडळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला या कुठल्याही प्राण्याचे दर्शन झाल तर समजून जा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *