नमस्कार मित्रांनो.
मंडळी घरातील सर्वात पवित्र चित्र स्थान म्हणजे आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजा स्थान हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात.
वास्तूमध्ये ओम स्वास्तिक श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते. चला तर मग जाणून घेऊयात, देवघरात पूजा स्थानिक चिन्ह ठेवण्याचे फायदे काय आहेत .
१) ओम चिन्ह- घरातील पूजा स्थानिक केशर किंवा चंदनाने ओम चिन्हाचे प्रतीक बनवा असे मानले जाते की, पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणाव सुद्धा दूर होतो. केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्यांना संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो.
२) श्री चिन्ह- श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीची विशेष कृपा राहते. वास्तू नुसार श्रीचे प्रतीक म्हणून घरात धन धान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील तसेच मध्ये परस्पर प्रेम निर्माण होते. पूजेच्या ठिकाणी श्री चे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते.
३) कळसाचे चिन्ह- घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्या सकारात्मक ऊर्जा राहते. या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. वास्तू नुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते. या सोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते.
४) कमळाचे चिन्ह- घरातील पूजा स्थानी कुंकू चंदन किंवा सिंदूर आणि पद्म कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तू नुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. या राशींमुळे सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात.