नमस्कार मित्रांनो.
२६ सप्टेंबर पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव चार ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाईल. आणि पाच ऑक्टोबरला आहे विजयादशमी अर्थात दसरा. या नऊ दिवसात भाविक वेगवेगळ्या प्रकारे देवीची उपासना करतात. आणि या घरात एक भाग म्हणजे नऊ दिवस या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापने बरोबरच अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते.
मात्र हा दिवा लावताना तीन चुका चुकूनही करू नये आणि त्यातली पहिली चूक म्हणजे दिवा कधीही जमिनीवर लावू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा. दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याखाली अष्टदल कमळ ठेवा. हे कमळ तुम्ही गुलाल किंवा अक्षदांनी सुद्धा काढू शकता.
अखंड ज्योत म्हणजेच जी खंडित होत नाही अशी अविरत जळत असते ती. आणि म्हणूनच दिव्यामध्ये घालायची वात ही साधारण तळहाताच्या एक बीट आणि पुढे चार बोट इतकी लांब असावी. नवरात्री जागरणही केले जातात. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचाच प्रतीक आहे.
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मजोत सदैवतेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहाव याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड तेवत राहणारा दिवा लावला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अखंड ज्योत हे अखंड श्रद्धेच सुद्धा प्रतीक आहे. अशावेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
यदाकदाचीत ज्योत मालवली तर छोट्या निरांजनाने पुन्हा जोत प्रज्वलित करावी. अस मानल जात की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटीने अधिक पुण्य प्राप्त होत. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यान धरणा केल्याने मन लवकर एकाग्र होत. अखंड ज्योत अशा ठिकाणी ठेवावी जिथे वारा कमी असेल. त्यामुळे दिवा विजण्याची भीती राहणार नाही.
घरात अखंड ज्योत असेपर्यंत घरातील वातावरण शांत ठेवा. भांडण करू नका घरात वादावादी करू नका त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करा. आणि सगळ्यात महत्त्वाच शाकाहारी भोजन करा. घरात अखंड ज्योत तेवत ठेवणार असाल तर नऊ दिवस घराला कुलूप लावू नका. अर्थात कोणी ना कोणीतरी सदस्य एक घरामध्ये असायला हवा.
घराला कुलूप लावून सगळे सदस्य बाहेर गेले आहेत अस करू नका. नवरात्रीमध्ये जो अखंड दीप लावला जातो तो शुद्ध तुपाचा असतो. पण ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवाही लावू शकता. तर मंडळी या नवरात्रीमध्ये या चुका टाळा आणि अखंड ज्योत तेवत ठेवा. तुमच्यावर आई जगदंबेची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.