नमस्कार मित्रांनो.
महाभारतात जेवणा विषयी काही नियम सांगितले गेलेले आहे जे लोक जेवण करताना या नियमांचे पालन करतात त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. शास्त्रात दिलेले हे नियम वैज्ञानिक दृष्टीने ही परिपूर्ण आहे. अशाप्रकारे भोजन केल्यास मनुष्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. भोजन करताना या नियमांचे पालन जरूर करावे. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी तसेच आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते.
तर यासाठी आहार ग्रहण करताना आहार ग्रहण करण्यापूर्वी किंवा आहार ग्रहण केल्यावर काय करावे याविषयी शास्त्रामध्ये काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन जर आपण भोजन करताना केले तर आपल्या घरामध्ये बरकत येते. यासाठी सर्वात आधी आपले दोन्ही हात पाय व मुख अशे पाची अंग धुवून आधी स्वछ करावे. मगच जेवणाला बसावे. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन नक्की करावे.
भोजन नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करून करावे. भोजनाचे ताट, पाठ, चटई किंवा उंच जागेवर सन्मानानेच ठेवावे. व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी. जेवण करताना शक्यतो मौन पाळावे बडबड करत किंवा गप्पा करत भोजन करू नये तसेच रागाने आणि संतापाने सुद्धा भोजन करू नये. जेवण करताना शांततेने व आरामात जेवण करावे जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये. दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे.
कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये. शक्यतो जेवण स्वयंपाक घरामध्ये बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये त्यामुळे आपले भोजन प्रेतयोनीत जाते. भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये. आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचुप जेवण करावे. ताटातील संपूर्ण जीवनच संपवावे उष्ट पडू देऊ नये तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी पडू देऊ नये त्यांना रात्री साफ करावे.
जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे. उष्टे ताट कधीच टेबलावर किंवा टेबलाखाली पडू देऊ नये. रात्रीच्या वेळी तांदूळ, दही याचे सेवन केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी या गोष्टींचे सेवन करू नये. जेवण करताना सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे अशी प्रार्थना करावी. मग त्यानंतरच जेवणाला सुरुवात करा. स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी.
तसेच स्वयंपाक झाल्यानंतर एक पोळी गाईला एक पोळी कुत्र्याला आणि एक पोळी कावळ्याला देऊनच आणि अग्नि देवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे. त्यामुळे त्यांच्यातील एकभाव वाढीस लागतो. पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग जळतात. म्हणून पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच जेवणाला बसावे. जेवण कधीही सोप्यावर बसून करू नये तसेच तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये.
खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये तसेच पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली ही कधीही जेवण करू नये. उभे राहून जेवण करणे सुद्धा खूप चुकीचे मानले गेले आहे परंतु आता बफे पद्धत निघाल्याने या नियमाला तर पायाखाली तुडवल जात आहे. खूप आंबट गोड तिखट किंवा खारट अन्न खाऊ नये तसेच कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये. जेवण करताना कोणत्याही संकटांवर चर्चा करू नये शक्यतो जेवण करताना मोन पाडावा.
जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू वस्तुंचा आस्वाद घ्यावा. जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावले देखील चालावी याला शतपावली असे म्हणतात. जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादा फळ खाल्ल्यास जेवण पचायला मदत होते. भीष्म पिता यांनी सांगितले आहे की, ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीचा पायाचा स्पर्श झालेला असेल त्या व्यक्तीचे ताट कोणीही खाऊ नये.
तसेच जेवण करताना ताटा मध्ये जर एखादा केस निघाला तर ते तसेच पडू द्यावे व नवीन ताटात जेवण करावे. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न तसेच खाल्ले गेले तर आपल्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो. जेवण करताना एखाद्या ताटाला कोणी ओलांडले असेल तर ते ताटातील अन्न सुद्धा कोणी खाऊ नये. भीष्म पिता म्हणतात एका ताटामध्ये जेवण केल्याने दोघा भावांच्या धनसंपत्ती मध्ये व प्रेमामध्ये वाढ होते.
कधीही पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये असे केल्यास ते ताट मादक पदार्थांनी भरलेले ताट बनते. लग्नापूर्वी कुवारी मुलीने व वडिलांनी एक ताटात जेवण करल्यास वडिलांच्या आयुष्यात वृद्धी होते. तर हे नियम लक्षात ठेवा व यांचे पालन करा.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.