Skip to content

नागपंचमी विशेष- कालसर्प दोषातून मुक्तीसाठी नागपंचमीला करा हे प्रभावी उपाय.

  • by

नमस्कार मित्रांनो.

नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. यावर्षी २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान शिवा सोबतच माता पार्वतीचाही आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ योग जुळून येत आहेत.

तसेच या दिवशी कालसर्प दोष दूर करण्याचीही संधी असते. कशी ते चला जाणून घेऊया. शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केली जाते. व्यक्तीला कालसर्पदोषापासून त्यावेळी मुक्ती मिळते. तसेच अध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतात. या दिवशी विशेष उपाय करणं देखील फायदेशीर ठरत. मग नागपंचमीला नक्की कोणते बर उपाय करावे.

अस मानल जात की ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे त्यांनी श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. त्यानंतर गरजू ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करावा. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलिक कालसर्प योग असल्यास नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. 

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात आठ नऊ किंवा दहा मुखी रुद्राक्ष घालावा. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जपही नियमित करावा. ज्यांना कालसर्प दोष शांती करणे पडणार नाही. अशा लोकांनी कालसर्प दोष शस्त्र पंचमीला म्हणावा अस ज्योतिष शास्त्र सांगत. 

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात राहो की तुझ्या मंत्राचा नियमित जप केल्याने सुद्धा कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. आता बघूया की यंदाच्या नागपंचमीचा मुहूर्त काय आहे. यंदा पंचमी तिथी ०२ ऑगस्ट रोजी पहाटे ०५:१४ मिनिटांनी सुरू होत आहे. ते ०३ ऑगस्टला ०५:३३ मिनिटापर्यंत. यावर्षी पूजेचा मुहूर्त ०२ ऑगस्ट रोजी सकाळी ०५:४२ मिनिटापासून ते ०८:२५ मिनिटांपर्यंत असेल. 

मंडळी तुमच्याही कुंडलीत कालसर्प दोष असेल तर यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघा नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर आपली सणवार हे आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात हे लक्षात ठेवा.

प्रत्येक क्षणाचा मूळ हेतू हा निसर्गाचे रक्षण करण्याचा आहे. निसर्गाची नासधूस करणे हा नाही. त्यामुळे अशा वन्य जीवांना निसर्गाला आपल्याकडून कुठलीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. आणि ती काळजी सुद्धा आपणच घ्यायला हवी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *