Skip to content

पितृदोष आहे की नाही कसा ओळखावा? तुमच्या सोबत या घटना घडत असतील तर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

पितृदोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक आहे. पण धावत्या जीवनामुळे  आपल्याला आपली अचूक जन्मवेळ माहिती नसल्यामुळे आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. अनेक जणांना हे सर्व माहीत असते तरी. कुंडली अभावी पितृदोष आहे का नाही हे निदान करणे अशक्य होते. परंतु यावर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितला आहे. 

आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचे सुक्ष्म अवलोकन करण्यासाठी ती दृष्टी आपल्याकडे असले तर आपल्याला माहित होते कि पितृदोष आहे का नाही. तर पितृदोष आहे का नाही हे तुम्ही आपल्या जीवनात घडत असलेल्या काही अनुभवांवरून तेच समजू शकतात. 

तर आम्ही तुम्हाला आज अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्यावरून तुम्ही ते ओळखू शकतात. तर कुटुंबात वडील आणि मुलगा यांच्यामध्ये सतत मतभेद होत असतील खटके उडत असतील व भांडण होत असेल तर तुम्ही समजुन जा की तुम्हाला पितृदोष आहे. कुटुंबातील मुलगी किंवा मुलगा यांच लग्न जमत नसेल.

 किंवा लग्न जमल असेल पण काही कारणास्तव ते मोडल असेल तर तुम्हाला पितृदोष असू शकतो. सोबतच लग्न होऊन खूप वर्ष झाली तरीही घरात पाळणा अजून हल्ला नाही आहे. म्हणजे तुम्हाला मुल होत नाही आहे किंवा झाले तरी अपंग किंवा गर्भपात होत आहे याचा अर्थ तुम्हाला पितृदोष असू  शकतो. 

आपल्या कुटुंबातील एकामागे एक सदस्य आजारी पडणे हे ही पितृदोषाचे लक्षण असू शकते. सोबतच कर्जाचे डोंगर डोक्यावर वाढणे व व्यापारामध्ये नुकसान होणे हे ही पितृदोषाचे लक्षण असते. किंवा परिश्रम घेऊनही नोकरी भेटत नाही. पितृ दोष असू शकतो. 

कुटुंबातील अन्य सदस्यांची भांडण होणे अन्न धान्याची बरकत नसणे, घरात वायफळ खर्च होणे याचा अर्थ पितृदोष असू शकतो. तर मित्रांनो हे काही कारण आहेत जे आपल्याला पितृदोष असण्याचे संकेत देतात. तर तुम्ही या कारणांवरून ठरवू शकतात की तुम्हाला पितृदोष आहे की नाही.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *