नमस्कार मित्रांनो.
पितृपक्षाचा काय हा पूर्वजांचा स्मरण करण्याचा काळ असतो. या काळामध्ये पूर्वजांसाठी अन्नदान आणि श्राद्ध कर्म केले जातात. यंदा हा पितृपक्ष २९ सप्टेंबर पासून सुरू होतोय आणि १४ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.पण पितृ पक्षाच्या काळामध्ये काही गोष्टींची खरेदी सुद्धा करू नये अस म्हटल जात. पण त्या गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया.
पितृपक्ष हा काळ इतरांची सेवा करण्याचा काय आहे. या काळामध्ये पितरांसाठी केलेल्या श्राद्ध कर्म तर्पण अन्नदान वस्त्रदान हे सगळ इतरांपर्यंत पोहोचत आणि म्हणूनच या काळामध्ये काही गोष्टी कराव्या काही गोष्टी करू नये अस आवर्जून सांगितल जात. त्यापैकीच काही गोष्टींची खरेदी करू नये अस जे म्हटल जात त्या गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत.
१) त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये मोहरी तेल खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक आहे. आणि पितृपक्षांमध्ये मोहरीच्या तेलाची खरेदी करू नये अस म्हटल जात
२) त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते त्यामुळे झाडू खरेदी करण्यासाठी हा काळ शुभ मानला जात नाही.
३) त्याचबरोबर मीठ मीठ हे सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. शिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते.म्हणून पितृपक्षात मीठ खरेदी करू नये. त्यामुळे ते आधीच आणून ठेवाव. पण यात एक अपवाद आहे की मोहरीचे तेल दान कराच असेल तर मात्र तुम्ही विकत घेऊ शकता. त्यावर कोणतही बांधन नाही.ते खरेदी करून तुम्ही दान करू शकता.
४) पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावी का? नवीन कपडे खरेदी करणे वर्ज मानले आहे. कारण पितृपक्षाच्या काळामध्ये इतरांना वस्त्रदान केले जातात.अन्नदान पितरांसाठी केला जातात आणि पितरांची सेवा केली जाते आणि म्हणूनच नवीन कपडे या काळात खरेदी केले जात नाही.
मित्रांनो इतरांसाठी या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही श्राद्ध पक्ष करू शकता इतरांच्या नावे अन्नदान वस्त्रदान गरजू व्यक्तींना करू शकतात. त्याचबरोबर इतरांना शांती मिळावी पितरांचा पुढचा प्रवास सुखकरवावा यासाठी भगवद्गीतेचा पठण या काळात करण शुभ मानला जातो. पितरांसाठी म्हणून या काळामध्ये भगवद्गीता पठण किंवा श्रवण आवश्यक कराव अस मांस आहार,मदिरासेवन या गोष्टी करू नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा पालन कराव.
आपल्या ऋषीमुनींनी हे पंधरा दिवस पितरांसाठी राखून ठेवले आहेत. त्यामागे निश्चितच काही कारण आहेत इतरांमुळेच आपला अस्तित्व असत. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काही ना काही तरी केलेल असत आणि म्हणूनच आज आपण कुठे असतो आणि त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. म्हणूनच पितृपक्षांमध्ये श्रद्धा कर्म नक्की कराव.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.