नमस्कार मित्रांनो.
मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ सध्या मेष राशीत आहे. पण दहा ऑगस्टला मंगळ मेष सोडून वृषभ राशित प्रवेश करेल. मंगळ दहा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून ३२ मिनिटांनी राशी बदलेल. असे मानले जाते की ज्याच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते ते शूर आणि निडर असतात. आणि प्रत्येक कामात त्यांना यश मिळते.
ज्योतिष शास्त्र अनुसार मंगळाचा संयोग काही राशींच्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो तर काही राशीवर अशुभ प्रभाव पडतो. १० ऑगस्टला मंगळ राशी परिवर्तनाने कोणकोणत्या राशींना शुभ प्रभात देणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिली रास आहे वृषभ रास.
वृषभ रास- १० ऑगस्टला मंगळ या राशीत दिसणार आहे. अशावेळी या राशीसाठी हे गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळणार आहे. या कालावधीमध्ये अडकलेले कामे आता पूर्ण होतील. कोर्टातील वादातून आता सुटका होईल. शत्रूंचा पराभव करण्यात तुम्हाला यश मिळेल. दुसरी रास आहे कर्क रास
कर्क रास- कर्क राशीच्या जातकांसाठीही हे गोचर शुभ राहील. या काळात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. शेतामध्ये काम करणाऱ्या जातकांचे कामाचे कौतुक होईल. तसेच पदोन्नती देखील मिळण्याची शक्यता आहे. पैशाची कमतरता आणि कर्जापासून आता तुम्हाला मुक्ती मिळेल. तिसरी रास आहे सिंह रास.
सिंह रास- सिंह राशीच्या जातकांसाठी हे गोचर विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती आता मजबूत राहील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. चौथी आणि शेवटची रास आहे.
धनु रास- संपत्तीत भरभराट होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात स्वतःहून यश मिळेल. तुम्ही कष्टाळू असल्यामुळे कष्ट करायला मागेपुढे पाहणार नाही. हे तुम्हाला भविष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तर मित्रांनो आज आपण खूप काही जाणून घेतल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.