Skip to content

पुढील ६ महिने या राशींच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

शनिदेव पुढचे ६ महिने मकर राशीत राहतील. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशीच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल. मंडळी अडीच वर्षांनी शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात. शनि महाराज हे सगळ्यात हळूहळू चालणारे ग्रह आहेत. 

म्हणूनच सर्व १२ राशींमध्ये संक्रमण होण्यासाठी त्यांना ३० वर्षे लागतात. यावेळी शनिदेव कुंभ राशीत असून प्रतिगामी स्थितीत आहेत. २९ एप्रिल ला शनिदेवांनी तीस वर्षानंतर कुंभ राशीत प्रवेश केला होता. आता १२ जुलैला प्रतिगामी गतीने ते मकर राशीत प्रवेश करतील. 

शनिच प्रतिगामी भ्रमण सर्व राशीतील व्यक्तींच्या जीवनावर मोठा प्रभाव पाटील आणि तीन राशीच्या लोकांसाठी मोठा लाभ घेऊन येतील. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणत्या लाभ प्राप्त होणार आहे. त्यातील सर्वात पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ रास- शनीच्या प्रतीकामी संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती होऊ शकते. त्यांना मोठ पद मिळू शकतं. नवीन नोकरी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. 

रखडलेली काम मार्गी लागतील असं म्हणायला हरकत नाही. धनलाभ सुद्धा होईल. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. असं म्हणता येईल की पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. आणि पुरेसा बँक बॅलन्स सुद्धा तयार होईल.

धनु रास- धनु राशीच्या लोकांना शनी संक्रमण भरपूर लाभदायी ठरणार आहे. धनधान्य मिळवून देणारे ठरेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. अनेक ठिकाणांमधून त्यांना पैसे मिळतील. गुंतवणुकीतूनही लाभ होईल.

 काही लोकांना अपेक्षा पेक्षा जास्त परतावा मिळू शकेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. व्यवसायिकांसाठी सुद्धा हा काळ लाभदायक आहे. नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक तुम्ही करू शकता.

मीन रास- प्रतिगामी शनीचे संक्रमण मीन राशि साठी आर्थिक लाभ देईल. नोकरी व्यवसायात लाभ होईल. त्याचबरोबर त्यांचे उत्पन्न वाढेल. नवीन श्रोतांकडून त्यांना उत्पन्न मिळेल. एकूणच त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. व्यापारी मोठे करार सुद्धा करू शकतात. हा काळ पदोन्नती पैसा प्रतिष्ठा सर्व काही देईल. 

वाद विवादांमध्ये सुद्धा त्यांना विजय मिळेल ही असल्याची गोष्ट. या होत्या त्या तीन राशी ज्यांना शनिमहाराजांच्या संक्रमणामुळे फायदा होणार आहे. पण तसंही तुम्हाला जर शनि महाराजांची कृपा मिळवायची असेल तर तुम्ही गरिबांची सेवा करायला हवी. गरजू व्यक्तींना दानधर्म करायला हवा. 

त्याचबरोबर आजारी व्यक्तींची सेवा करणाऱ्यांना सुद्धा शनि महाराज प्रसन्न होतात. सगळ्यात महत्त्वाच आई-वडिलांची सेवा जी व्यक्ती करते त्यांच्यावर शनि महाराज नेहमीच कृपा करतात. आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनी महाराज बाकी ग्रह किती जरी चांगले असले तरीसुद्धा कधीही क्षमा करत नाहीत हे लक्षात ठेवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *