Skip to content

पैसे मोजता मोजता थकून जाल ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी करोड मध्ये खेळतील या ६ राशी

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भक्तगण मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रांनो या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. हा सन सर्वात सुंदर सण मानला जातो. शुद्ध अंतकरणाने श्रद्धापूर्वक गजाननाची उपासना केल्याने भक्ती भावाने गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मित्रांनो भगवान श्री गणेश हे रिद्धी सिद्धीचे दाता मानले आहेत. ते सुख समृद्धी आनंद आणि वैभववाचे दाता मानले जातात. श्री गणेशा प्रथम पूजनीय देव आहेत कोणतेही शुभ कार्यकर्त्यांना भगवान गणेशाची पूजा करणे हे शुभ मानले जाते. ते प्रथम पूजनीय मानन्यात आले आहेत. काम छोटे असो अथवा मोठे साधारण असो अथवा महत्त्वपूर्ण असो कोणतेही जरी काम करायचे असेल तरी विघ्नहर्ता श्री गणेशाची गणपती बाप्पाची पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. 

भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी म्हटले जाते. या शुभमुहूर्तावर आणि शुभ संयोगावर श्री गणेशाची स्थापना केली जाते. मान्यता आहे की गणेश चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता. एका महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात. पहीली तिथी कृष्णा पक्षात आणि दुसरी येते ती शुक्लपक्षात या दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित असतात. 

अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा अर्चना करणे शुभ मानले जाते. भगवान गजाननाची पूजा केल्याने बुद्धी सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. गणेश चतुर्थीचा उत्सव हा संपूर्ण दहा दिवसापर्यंत चालतो. आणि या दहा दिवसापर्यंत या उत्सवामध्ये मोठ्या आनंदात भक्तगण गजाननची भक्ती आराधना करतात. 

अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मित्रांनो हे दहा दिवस अतिशय आनंदाचे आणि सुखाचे मानले जातात. बाल तरुणांना सर्वांसाठी भगवान गणेश हे आकर्षण आहेत. त्यामुळे हे दिवस भगवान गणेशाला समर्पित आहेत. हे दिवस भगवान गणेशासाठी विशेष लाभकारी मानले जातात. हे दिवस अतिशय सुंदर मानले जातात. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये अगदी उल्लासामध्ये कधी निघून जातात. हे कळत सुद्धा नाही.

मित्रांनो यावेळी गणेश चतुर्थीला ग्रह नक्षत्रांचा अतिशय दुर्मिळ योग बनत आहे. त्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात अतिशय सकारात्मक ठरणार आहे. गणेश चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल यांचे भाग्य आता यांच्या जीवनामध्ये यांना कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. 

जीवनात चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो पंचांगानुसार यावर्षी 31 ऑगस्ट बुधवार रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून चतुर्थीची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ वाजून ३० मिनिटापासून सुरू होणार आहे. आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ वाजून २२ मिनिटानंतर होणार आहे. 

भगवान श्री गणेशाच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून २४ मिनिटांपासून ते दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहणार आहे. या दिवशी शुक्राचे राशी परिवर्तन होत असून शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार असून शुक्राचे होणारे राशि परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. गणेश भक्तांसाठी हा दिवस विशेष लाभ खाली ठरणार आहे. चतुर्थी पासून पुढे येणार काळ जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य यामध्ये आपल्याला भरगोस यश मिळण्याचे संकेत आहेत. 

जर आपण व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये मोठी संधी चालून आपल्याकडे येऊ शकते. त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरच्या क्षेत्रामध्ये आणि नोकरी करणाऱ्यांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. 

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर श्री गजाननाची विशेष कृपा बसणार आहे. गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनाती  अनेक समस्या समाप्त होणार आहेत. जीवनामध्ये वारंवार येणारी संकटे याचा दूर होतील. त्याबरोबर शुक्राचे राशी परिवर्तन देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. 

मित्रांनो शुक्राचे सिंह राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन आपल्या वैवाहिक जीवनामध्ये याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. वैवाहिक जीवन सुरळीत करणार आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात गोडवा दिसून येईल. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत बनणार आहे. 

धनलाभाचे योग जमून येतील. शुक्राच्या कृपेने सुखसमृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पैसा कमावण्याचे अनेक साधन आपल्याला या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांशा पूर्ण होऊ शकतात. 

सिंह राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आणि सोबतच गजाननाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनामध्ये आनंदाने प्रसन्नतेची बहार येणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. राजकीय लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये भरतीचे योग येऊ शकतात. 

अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची आपली इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

कन्या राशि- कन्याराशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे. गणेश चतुर्थी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. 

मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. भगवान गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये चालू असणारे अपयशांचे दिवस आता संपणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. शत्रुवरी विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वाढ होईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

तुळ राशी- तूळ राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राचे सिंह राशीत होणारे गोचर आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरघोस लाभ प्राप्त होणार आहे. पत्रकारिता मार्केटिंग किंवा कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. 

अनेक दिवसापासून नोकरीचा शोध घेणाऱ्या लोकांसाठी नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. घर जमीन अथवा वाघ सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होणार आहेत. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची कृपा बरसणार असून शुक्राचे होणारे राशि परिवर्तन जीवनामध्ये आनंदची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. 

घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाऱ्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

कुंभ राशी कुंभ- राशीच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट काळ पूर्णपणे बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. 

अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. गजाननच्या आगमनाने आपल्या जीवनात आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आता करिअरमध्ये देखील प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.