Skip to content

प्रगती, संपत्ती व समृद्धीसाठी वास्तुशास्त्राचे हे ७ उपाय नक्की करा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्रानुसार जर घरात प्रगती होत नसेल पैसा उभा राहत नसेल जर घरातील काही सदस्य आजारी राहत असतील तर त्यासाठी तुमच्या घरातील वास्तुदोष या सर्वाला कारणीभूत ठरू शकतो. घरातील खराब वस्तू तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात. 

ज्याप्रमाणे आपण माणसे मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करतो. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा ही मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. वास्तुशास्त्रामध्ये काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहेत. ज्या द्वारे तुम्ही सकारात्मक ऊर्जा वाढवून घरात सुख समृद्धी आणि आनंद आणू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काही सोपे उपाय.

पहिले भारतीय संस्कृतीत स्वास्तिकला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेटवर सिंदूर लावून स्वस्तिक चित्र लावावे. ते स्वस्तिक नो बोट लांब आणि नऊ बोटे रुंद असावे. कसे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढते. तसेच रोग आणि दुःख कमी होतात. असे केल्याने घरातील रोग आणि शोक कमी होतात.

दुसरे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी एका कुंडीत मुख्य गेट जवळ केळीचे झाड लावा. आणि त्याच बाजूला तुळशीचे रोप लावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतातच पण सकारात्मक ऊर्जा घरात राहते. आणि घरातील सदस्यांची प्रगती होते. घरातील सदस्यांना पदोन्नती देखील मिळते. 

तुम्ही प्लॉट खरेदी करून बराच काळ झाला असेल. आणि त्यावर घर बांधण्याची शक्यता नसेल, तर पुष्य नक्षत्रात त्या प्लॉटमध्ये डाळिंबाचे रोप लावावे. असे केल्याने लवकरच घर बांधण्याची शक्यता आहे.

चौथी घरामध्ये तुटलेली भांडी किंवा खाट कधीही वापरू नका. तुटलेली आणि निरोपयोगी भांडी घरामध्ये जागा व्यापतात. त्यामध्ये जेवण दिल्याने गरीबी वाढते. आणि वास्तुदोष ही निर्माण होतो. तसेच तुटलेली खात ठेवल्याने घरात मोठे नुकसान होते. आणि अशाप्रकारे तुमचे पैसेही बुडतात.

पाचवी घराच्या सुख-समृद्धीसाठी स्वयंपाक घर खूप खास मानले जाते. जर स्वयंपाक घर चुकीच्या ठिकाणी असेल तर फायर अँगल मध्ये बल्ब लावा. आणि तो बल्ब रोज सकाळ संध्याकाळ काळजीपूर्वक पेटवा. याने वास्तुदोष दूर होतो. तसेच घरात सुख-समृद्धीही वास करते.

सहावे दररोज आपल्या घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावा सकाळ आणि संध्याकाळी तीन वेळा शंख वाजवा. घरातील नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते आणि आणि देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो. सातवे वास्तुशास्त्रानुसार घरातील देवतांना अर्पण केलेले फुलाचे हार दुसऱ्या दिवशी काढून टाका.

दुसऱ्या दिवशी नवीन फुलांचे हार देवतेला अर्पण करा. तुळशी बेलपत्र बाबर वेली पान कमलगट्टा आणि इतर फुलांच्या संदर्भात शास्त्रात जलाभिषेकानंतर यांचा वापर करावा. नेहमी लक्षात ठेवा देवघरातील वाहिलेली फुल लगेच काढून टाकावीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *