Skip to content

फक्त १ मंगळवार हनुमान मंदिरात जाऊन करा हा उपाय जे मागाल ते मिळेल.. हनुमानजींची होईल विशेष कृपा.

नमस्कार मित्रांनो.

एखादा महत्त्वाचा कार्य पूर्ण करण्यासाठी आपण जीवाच्या एकांताने मेहनत करत असतो. असे असले तरी बऱ्याचदा त्या कामात मध्ये आपल्याला सफलता मिळत नाही. त्यासाठी आपण अनेक व्रत, उपवास, अनुष्ठान करतो तरीसुद्धा त्या कार्यात सफलता मिळत नाही. मात्र तेच काम अगदी साधा सोपा उपाय किंवा एखादा तोडगा केल्याने त्वरित पूर्ण होतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत.

तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केलात तर तुमच्या कार्यात सफलता निश्चितच मिळेल. मित्रांनो या कलियुगात साक्षात सूक्ष्म रूपाने वास करणारे देव देवता म्हणजे श्री हनुमान श्री रामाने हनुमानाला अमरत्व प्रधान केले होते. प्रभूश्री राम यांनी हनुमाना सांगितले होते की धरतीवर अशी एक वेळ येईल जेव्हा या धरतीवर पापी लोकांची संख्या जास्त असेल, यावेळी कोणतेही देवी देवता इथे कोणताच अवतार घेणार नाहीत.

अशा वेळेस श्री हनुमानना राम भक्तांची रक्षा करायची आहे आणि त्या लोकांच्या इच्छा पूर्ण करायचा आहेत. जे सज्जन आहेत, जे माझ्या नावाचा जप करतात. मित्रांनो आपण सर्वांनाच माहीत आहे के श्री प्रभू रामाचे श्री हनुमान परमभक्त आहेत. राम दूत आहेत. प्रभू श्रीरामाच्या आज्ञाच उल्लंघन ते कधीच करत नाहीत. त्यामुळे कलियुगात सर्वात जास्त फळ देणारी कोणती देवता असेल तर ती असेल श्री हनुमान.

मित्रांनो कोर्टकचेरी मध्ये तुमची एखादी केस चालू आहे त्या केसचा निर्णय लागत नसेल किंवा तुमच्या घरावर जमिनीवर एखाद्याने कब्जा केला असेल किंवा तुमच्या नोकरी धंद्यात काही समस्या आहेत. मित्रांनो अशा अनेक समस्यांचा नाश करण्यासाठी या समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो ज्या समस्येसाठी हा आपण उपाय करत आहोत. ती समस्या आपल्या जीवनातून निश्चितच दूर होईल. असा दृढ विश्वास आपल्या मनात ठेवायचा आहे. मित्रांनो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही जर हा उपाय केला तर या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊयात. हा उपाय नक्की करायचा कसा आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारचा दिवस निवडायचा आहे. कारण मंगळवार हा श्री हनुमानाचा दिवस आहे. तर मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रतविधी उरकून, स्नान करून आपल्या घराच्या जवळील हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला नऊ लवंग घ्यायचा आहेत. लक्षात ठेवा लवंग अखंड हव्यात. तुटलेल्या नसतील याची काळजी घ्या.

ज्यांना पुढे फुल आहे अशा अखंड नऊ लवंगा घ्यायच्या आहेत. या नवलंगांची एक अखंड माळ करायचे आहे. धाग्यामध्ये या नऊ लवंगा बांधायचे आहेत. जेणेकरून याची माळ आपण श्री हनुमानाला अर्पित करू शकतो. सोबत नैवेद्यासाठी गुळाचा छोटा तुकडा आणि थोडसं गाईचं दूध घ्यायचं आहे. आता हे सर्व घेऊन आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे.

शक्य असल्यास मंदिरात जाताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. मंदिरात गेल्यावर थोडसं तेल आणि शेंदूर मारुतीरायाच्या मूर्तीला अर्पित करायचे आहे. लक्षात ठेवा मूर्तीवर म्हणजे श्री हनुमानाच्या डोक्यावर हे अर्पण करायचे आहे. जेव्हा तेल आणि शेंदूर याची आंघोळ मारीतरायांच्या पाया जवळ येईल. तेथील थोडं तेल आणि शेंदूर घेऊन आपल्या मस्तकावर तिलक करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय करताना,”जय श्रीराम” या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. नंतर गूळ आणि तुपाचा नैवेद्य श्री हनुमानाला अर्पित करायचा आहे. आता ती लवंगाची माळ आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि संपूर्ण हनुमान चालीसाचे पठण आपल्याला करायचे आहे. संपूर्ण हनुमान चालीसाचे पठण होईल तोपर्यंत उजव्या हातातच ही माळ ठेवायचे आहे. पठण झाल्यानंतर ही माळ श्री हनुमानाला अर्पित करायचे आहे.

आता मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्याचं निवारण व्हावं यासाठी याची प्रार्थना करायची आहे. आपल्या घरात सुख शांती,सुख समृद्धी, धन वैभव यावं तसेच आपल्या जीवनातील तमाम समस्यांचा नाश होण्यासाठी श्री मारुतीरायाकडे प्रार्थना करायचे आहे. जेवढ्या श्रद्धा आणि विश्वासाने प्रार्थना करून हा उपाय कराल तेवढ्या लवकर या उपायाचा लाभ होईल. आता हे सर्व झाल्यानंतर सरळ घरी निघून जायचं आहे.

हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार टोकणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो हा उपाय फक्त एक मंगळवारी केलात तेवढ्यात तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल. मित्रांनो एकच मंगळवार करून तुम्हाला फरक जाणवला नाही तर तुम्ही पुढच्या मंगळवारी हा उपाय तुम्ही पुन्हा करू शकता. मित्रांनो काही दिवसातच तुमच्या जीवनातील तमाम समस्याचा नाश नक्कीच होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *