Skip to content

फक्त ५ सोमवार करा पशुपती व्रत होईल तुमची इच्छा पूर्ण. घरात सुख-समृद्धी, आनंद येईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

पशुपती व्रत हे भगवान शिवशंकराने पवित्र व्रत आहे. यासाठी सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेच ताट आणि कलश तयार करून मंदिरात जाऊन शंकरांचा जलाभिषेक करावा पूजेच्या वस्तू तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार घेऊ शकतात. 

पशुपतिनाथाच्या पूजेच्या ताटात तुम्ही फल फूल तांदूळ प्रसाद बेलाची पानं आणि दक्षिणा मात्र नक्की घ्या. पूजा संपल्यानंतर दक्षिणणि प्रसाद द्या दिवा लावून आरती करा. त्यानंतर भगवान पशुपतिनाथ यांना तुमची मनोकामना सांगा संकट दूर करण्याची विनंती करा. 

सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळी पशुपतीची पूजा करावी. त्यासाठी ते ताट संध्याकाळी मंदिरात घेऊन जाव. प्रसाद बनवावा व त्याचे तीन भाग करावेत आणि सहा दिवस ठेवावेत. भगवान शिवशंकर यांना ते सगळं समर्पित करावे. पूजेनंतर त्या तीन भागापैकी दोन भाग मंदिरात ठेवावे लागतात. आणि एक भाग घरी परत आणावा. 

६ दिव्यांपैकि ५ दिवे मंदिरात लावायचे. आणि एक दिवा न लावता घरी आणायचा. आणि तुम्ही घरात प्रवेश करत असताना मुख्य दरवाज्याच्या उजव्या हाताला तो दिवा लावल्यानंतर पुन्हा तुमची इच्छा मनोकामना भगवान शिवशंकरांना सांगायची आणि मगच घरात प्रवेश करायचा. 

भगवान पशुपतीच्या उपवासात सकाळी फळ खाल्ली जातात आणि संध्याकाळी पशुपतिनाथाची पूजा केल्यानंतर भोजन केले जाते, संध्याकाळच्या पूजेच्या वेळी प्रसादाचे तीन भाग घ्यावे. दोन भाग अर्पण करावे एक भाग घरी आणावा या आणलेल्या एका भागाचा प्रसाद आदी खावा. आणि नंतर घरातल्या सगळ्यांना ही तो प्रसाद द्यावा. आणि त्यानंतर जेवण करावे. 

जेवणात दोन्ही वेळेस मीठ खाऊ शकतो. या व्रतामध्ये मीठ खाणे वर्ज्य नाही. या पूजेचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाऊन ज्या पशुपतिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन या व्रताची सुरुवात केली आहे. त्याच मंदिरात प्रत्येक सोमवारी पूजेसाठी जायच आहे. मंदिर बदलायचं नाही असं शास्त्र सांगत. 

त्यानंतर येवढ्यात किती सोमवार कराव तर तुमच्या श्रद्धेनुसार कितीही सोमवारी हे व्रत करता येत. फक्त किती सोमवार करायचे ठरवले आहेत. त्याचा संकल्प आधी करावा. आणि ते सोमवार पूर्ण होईपर्यंत एकाच ठिकाणी रहावे. प्रवास करू नये. 

लोक जास्तीत जास्त सलग पाच सोमवार हे व्रत करतात, काही अडचण मासिक धर्म किंवा काहीतरी कारण असेल तर तेवढा एकच नंबर सोडून द्यावा. आणि पुन्हा परत सुरु करावे. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *