Skip to content

बुध ग्रह तुळ राशीत विराजमान या ५ राशींवर होईल चांगला परिणाम. घोड्याच्या वेगाने धावणार यांचे भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी बुध ग्रहाणे तूळ राशीत प्रवेश केला आहे. आणि तेरा नोव्हेंबर पर्यंत याच राशीत राहील. यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. यासह दुधाचे हे संक्रमण सर्व बारा राशींवर  कसा परिणाम करेल हे जाणून घेऊया. कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील आणि कोणत्या लोकांना अडचणी येतील. चला तर मग बघुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी. ज्यांना चांगला परिणाम मिळणार आहे.

१) मेष रास- तूळ राशीत बुधाच्या प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. या प्रवासासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच जे लोक या काळात भागीदारीत व्यवसाय करतात. त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच तुमचे भावंडासोबतचे नातेही चांगले राहील. असाच चांगला काळ टिकवण्यासाठी बुधवारी दुर्गा मातेला हिरव्या बांगड्या अर्पण करा.

२) वृषभ रास- दुधाची संक्रमण वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल. या काळात तुम्हाला पैसे  कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. एवढेच नाही तर या कालावधीत तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडण्यास सक्षम असाल. यावेळी घरगुती वस्तूंच्या खरेदीवर तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमचे बजेट बनवण्याचा सल्ला दिला जाईल. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या प्रियकरा सोबत प्रवासाला जाण्याचाही प्लॅन करू शकता.

३) मिथुन रास- बुधाच्या संक्रमणामुळे मिथुन राशीचे लोक कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवतील. या काळात तुम्ही तुमच्या कोणत्याही जुन्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक लाभाच्या संधी मिळतील. ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे तुम्ही इतर गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. असा सल्ला दिला जाईल.

४) कर्क रास- कर्क राशीवर बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव खूप शुभ असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय शांततापूर्ण वातावरण असेल. एवढेच नाही तर घरातील सगळे सदस्य एकमेकांना संपूर्णपणे सहकार्य करतील. यासोबतच तुम्ही भरपूर पैसेही कमवू शकता. नोकरदारांचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. आपणास सल्ला दिला जाईल की तूर्तास कोणालाही पैसे देऊ नका.

५) सिंह रास बुध संक्रमण तुमचे भावंडासोबतचे संबंध सुधारेल. तुमच्या बोलण्याला ही घरात खूप महत्त्व दिले जाईल. कामाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. या संक्रमण काळात तुमचे भाग्य पलटण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला कोणतेही पैसे गुंतवणे टाळावे लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *