Skip to content

बेडरूम कसे असावे? वास्तु शास्त्र टिप्स ! श्री स्वामी समर्थ

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपण घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करतो. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना असेल. तर कितीतरी प्रकारची संकटे व अडचणींपासून आपली सुटका होते. घर बांधताना जर दिशांचा विचार न करता योग्य ठिकाणी योग्य खोली बांधली गेली. तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 

जसे घरात सतत आजारपण वादविवाद भांडणे आर्थिक अडचण मुला-मुलींच्या लग्नात अडथळे अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागते. घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार जरूर करावा. आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची खोली म्हणजे बेडरूम आपल्या दिवसभराचा थकवा घालवतो. 

जर आपल्याला शांत झोप लागली तरच आपण दुसऱ्या दिवशी आनंदी व प्रसन्न मनाने आपल्या कामात लक्ष देऊ शकतो. म्हणूनच आज आपण आपले बेडरूम कसे असावे कोणत्या दिशेला असावे बेडरूम कुठे नसावी. या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. वास्तु मोठी असेल व जागा भरपूर असेल तर उत्तरेकडील वायव्य भाग सोडून व बैठक खोलीच्याशेजारी बेडरूम असणे सर्वात चांगले आहे. 

देवघर असलेल्या खोलीत बेडरूम कधीही नसावे. उत्तरेकडील बेडरूम मुळे काही प्रमाणात सूर्याची किरणे सकाळी येतात. यामुळे सकाळी उठताच सूर्य दर्शनाचा लाभ होतो. उत्तरेकडील बेडरूममध्ये दक्षिणेत अथवा पूर्वेस डोके ठेवुन झोपल्या शांत झोप लागते. उत्तर अथवा पूर्व दिशेला डोके ठेवुन झोपल्यानंतर चांगली स्वप्ने पडतात धनलाभ होतो. ऐश्वर्य वाढते. 

पश्चिमेकडील कोपऱ्यात घरातील प्रमुख कर्त्या पुरुषाचे बेडरूम असावे. एकापेक्षा अधिक मजले असल्यास कर्त्या पुरूषाने वरील मजल्यावरील पश्चिमेकडील नैऋत्य कोपर्‍यात बेडरूम करणे सर्वांत चांगले. मोठ्या मुला करता देखील चालू शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत या कोपऱ्यात लहान मुलांची अथवा मुलीचे बेडरूम नसावी. 

यामुळे घरातील कुरबुर वाढते. अनावश्यक भांडणे होतात. वादविवाद होतात.  दक्षिण दिशेस देखील बेडरूम चालू शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत या वेळी रूममध्ये दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. दक्षिणेस व अग्नेयास एकही दार नसावे. फार फार तर एखादी लहानशी खिडकी असली तर चालेल. पश्चिम दिशेकडे बेडरूम मुलाकरता सर्वोत्तम आहे. 

पूर्व दिशेची बेडरूम देखील अविवाहित मुला-मुलींना किंवा अतिथींना झोपायला चालू शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत नवीन जोडप्याला या खोलीत झोपू देऊ नये. मित्रांनो या विषयी काही महत्त्वाच्या टिप्स. आपले घर बांधताना  या टीप्सचा जरूर वापर करा. 

व जर आपले घर आधीच बांधलेले असेल तर यापैकी जे बदल करता येतील ते आपल्या घरात करा. व सर्व प्रकारच्या अडचणी व संकटांपासून मुक्ती मिळवा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *