Skip to content

भावनाप्रधान आणि प्रेमळ रास कर्क. कसा असतो कर्क राशीचा स्वभाव? गुण, वैशिष्ट्य, जाणून घ्या अजून बरेच काही कर्क राशी विषयी.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी चक्रतील हि चौथी राशी मिथुन राशीनंतर येणारी कर्क नक्की काय आहे या राशीच गुणवैशिष्ट्ये आणि स्वभाव याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.कर्क राशीबदल एका शब्दात सांगायच झाल तर अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व कर्क हि राशीचक्रतील चौथी राशी मेष,वृषभ, मिथुन आणि चौथी रास कर्क.राशीचा स्वामी आहे चंद्र जो मनाचा कारक ग्रह मानला जातो.

जल तत्वाची राशी असुन स्री वर्ण आणि विप्र वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्णनाची राशी त्यामुळे अत्यंत स्वभावाने हळवा स्वभाव, दयाळू मनाची भुमिका राहणारी कर्क राशी आहे. मंडळी ब्राह्मण वर्गाची राशी म्हणजे विप्र वर्णची राशी असल्यामुळे सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याशी स्वतः ला जोडू पाहणारी ही कर्क राशी आहे.चद्रांच्या अंमलाखाली हि कर्क राशी येत असल्यामुळे याना अंतर ज्ञान किंवा अंतर मनाच्या जाणीवा फार लवकर होतात.

त्यामुळे निसर्गाशी असलेली जवळीक साधन यांना फार लवकर जमत.म्हणुनच मेडिटेशन फार सुंदर करतात.त्यामुळेच कला, संगीत, कवित्व यांना उपजतच पणे येत असते.आणि म्हणून या राशीला कवी मनाची रास असही म्हटल जात. लोकाना मदत करन लोकांच्या उत्कर्षासाठी आग्रही राहणार यांच्या स्वभावामध्ये असत. अत्यंत स्वभावाने हळवे असल्यामुळे कोणाच्याही वाईट बोलण्याचा वाईट वागण्याचा मात्र त्यांच्या मनावर खोल परिणाम होत असताना दिसतो.

सतत इतरांचा विचार करत राहणार हा सुद्धा स्वभाव यांचाच असतो. दुसऱ्यांसाठी नेहमी चांगला करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करता ती कर्क राशि. परंतु यांच्या बदल्यात आपण जर कोणासाठी काय चांगल केल तर इतरांनाही यांच्याशी चांगल वागाव अशी अपेक्षा सुद्धा करतात त्यामुळे समोरच्याने तस नाही ना केल तर मात्र तेवढाच दुःखी आणि कष्टी होतात.

आपण सर्वांसाठी करतो आपल्यासाठी कोणीच काही करत नाही याच्यात सततच्या विचाराने मात्र मनावर परिणाम करून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या हळव्या आनंदी स्वभावावर स्वतः विर्जन सुद्धा घालतात. जलतत्त्वाची राशी असल्यामुळे बऱ्याचदा भावनेच्या भरात वाहून जाताना दिसतात. त्यामुळे कर्तव्य आणि भावनांच्या गोंधळात मात्र ही कर्क राशीची मंडळी बऱ्यापैकी नेहमी अडकताना दिसतात.

कौटुंबिक जीवनाची आवड यांच्यामध्ये प्रचंड असते. त्यामुळे याराशी उत्कृष्ट अशा गृहिणी असतात अगदी पुरुष असला किंवा स्त्री असली तरी पाहुण्यांची उठ बस करायला यांना खूप आवडत. स्वच्छ मनाच्या राशी म्हणजेच कर्क राशी. यांच्यामध्ये अजून एक सुंदर गुणधर्म आढळतो तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हवी असणारी जी गोष्ट आहे ना ती मिळूनच दाखवतात. आणि त्यासाठी प्रयत्न करतो. आपल सर्व मानसिक बळ लावतात.

याराशी हळव्या स्वभावाचे असल्याने तेवढेच त्यांच्यामध्ये कणखर स्वभाव आढळतो बर का निश्चयपणा,चिकाटी, अधिकार ग्रहण करण हे गुणधर्म सुद्धा परिस्थितीनुसार यांच्यामध्ये सहज उतरतात. म्हणजेच नुसती हळवी समजू नका कणखर पण आहेत. अत्यंत हिशोबी काटकसरी स्वभावाच्या या व्यक्ती असतात. स्री तत्वाची राशी असून राजकारण करण्यामध्ये यांचा आज कोणी धरू शकत नाही.

म्हणूनच प्रेमळ स्वभाव असला धूर्तपणा सुद्धा या राशींमध्ये तितकाच असतो. प्रत्येक राशी मध्ये जसे शुभ परिणाम आढळतात तसेच याही राशीमध्ये शुभ परिणाम आढळतात. परंतु चंद्र जर या राशीमध्ये दूषित किंवा अशुभ असेल तर काही दुष्परिणाम कर्क राशि मध्ये आढळतात. ते म्हणजे मानसिक चंचलता कल्पना साम्राज्यात रंगून जाणे पोकळ डवूल दाखवणे, अति हळवेपणा ठेवन, चिडचिड पण आणि चिरचिरपणा स्वभाव मध्ये असतो.

परंतू चंद्र शुभ असल्यास व्यवहारी पणा, सहनशील, क्षमाशील हे शुभ गुणधर्म आपल्या याच कर्क राशि मध्ये आढळतात. कर्क करिअरचा विचार केला अभिनय,कला, फॅशन डिझायनिंग, इंटरियर डिझाईन, मेडिकल, नर्सिंग, शिक्षक, अध्यापक, ट्युशन, ज्योतिष यांसारख्या गुढ विषयांची आवड केव्हा करियर, सेल्समन, नर्सरी, अकाउंटिंग, गणित तज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट करणे.

हॉटेलच्या संबंधित कामकाज करणे, पाण्याची संबंधित काम करणे, मेकॅनिक अशा कार्यक्षेत्रामध्ये कर्क राशी यशस्वी असते. तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा जम चांगला राहतो. कायद्याचा अभ्यास करायला सुद्धा या राशीच्या मंडळींना अगदी मनापासून आवडते.

मित्रांनो आता आरोग्याचा विचार केला तर कर्क राशीला सर्दी,खोकला, वायरल इन्फेक्शन, छातीचे आजार आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्य पाण्यातील बदलामुळे होणारे आजार किंवा दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजार यांना फार सांभाळावे लागतात. तसंच अचानक वजन वाढण्याचा धोका सुद्धा या राशीमध्ये असतो. त्यामुळे योगा मेडिटेशन या मधुन यांना आपल्या आरोग्य सांभाळण्यासाठी खूप चांगली मदत होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *