Skip to content

मंदिरात जाण्याआधी मंदिराच्या पायरीला नमस्कार का करतात? जाणून घ्या या मागील रहस्य.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपण मंदिरात जातो चपला बाहेर काढतो पाय धुतो आणि स्वच्छ देहाने आणि स्वच्छ मनाने मंदिरात पाऊल ठेवतो. तस करताना आपला हात आपोआप मंदिराच्या पायरीला स्पर्श करतो. त्यामागे कारण काय असू शकेल याचा कधी विचार केलाय का. नाही केला तर चला मग जाणून घेऊया. मंडळी मंदिरात जाताना मंदिराची पायरी ही देवाकडे नेणारा दुवा असते.

ती ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातली देव मूर्ती आपल्याला दिसणार नाही. तिथेच कोणी रोखून धरले तर देवदर्शन घडणार कसे म्हणून त्या पायरीची महत्त्व अधिक आहे परंतु गंमत अशी आहे की ज्या पायरीला नमस्कार करून आपण मंदिरात जातो. त्या पायरीचा आपल्याला मंदिरातून निघताना विसर पडतो.

तेव्हाचे दर्शन झाले की त्या पायरीला उलनून पायात चपला अडकवून आपण परत जायला निघतो. म्हणजेच काम झालं की आपण तिलाच विसरतो. आणि तसं घडणं स्वाभाविक आहे नव्हे तर तो मनुष्य स्वभाव आहे. तसं होऊ नये पण ती राग व्यक्त करत नाही. तर आपण भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा बनू शकलो याबद्दल ती पायरी समाधान मानत असते.

संत सांगतात आपला देह देखील मंदिराचा प्रतीक आहे. देह हे देखील देवाकडे नेणारे द्वार आहे. आचार्य अत्रे लिहितात देह देवाचे मंदिर आहे. आत्म परमेश्वर आहे म्हणजेच जशी मंदिराची पायरी ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातला देव दिसत नाही. तशी देहाची पायरी ओलांडे शिवाय हृदय स्तर परमेश्वर दिसत नाही.

एकदा का त्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि अंतर्यामी सूर गवसला की परत देहाच्या दिशेने उलट प्रवास होणार नाही. त्याचप्रमाणे देवदर्शन झाल्यावर पायरीला नमस्कार करण्याचे भान उरत नाही. तसे देहाचा सदुपयोग करून आत्मनामाची भेट घेतली की देहासक्ती राहत नाही. यासाठी देहाला मंदिराच्या पायरी इतके महत्त्व द्यावे.

मंदिरात जाताना असे आपण पायरीशी रेंगाळत नाही तर नमस्कार करून आज जातो. तसेच देहात न रमता आत्मरामाकडे वाटचाल करावी असं म्हटलं जात. स्वतः स्वतःची ओळख करून घ्यावी. अंतरीचा आवाज ऐकावा देहाला मंदिरासारखे पवित्र कफकरहित स्वच्छ निर्मळ ठेवावे. म्हणजे गाभाऱ्यातला देव दिसल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जात.

असेही म्हटल जात की, मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्ती कडे नेणारा प्रवास निर्गुणांकडून सगुनाकडे आणि परत सगूनाकडून निरगुनाकडे नेणारा असतो. तर मंदिरात जाण्याआधी मंदिराच्या पायरीला नमस्कार का करतात याबद्दल तुम्हाला पडलेला प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले का. अशाच प्रकारची काही आध्यात्मिक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *