Skip to content

मकर रास- ऑगस्ट महिन्यात तुमच्या जीवनात या घटना १००% घडणार म्हणजे घडणारच…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मकर ही राशिचक्रातील दहावी रास आहे. मकर राशीचे लोक कष्टाळू असतात मेहनती असतात आणि प्रामाणिक असतात. पण यांना यश मिळवायला मात्र बरेच कष्ट करावे लागतात. कधी कधी नियती सुद्धा यांची परीक्षा बघते आहे का असं वाटायला लागतं. परंतु ही लोकं हार मानत नाहीत. झगडत राहतात लढत राहतात.

 शनिमहाराज या राशीचे स्वामी आहेत. आणि त्यामुळे यांचा प्रवास खडतर असतो हे नक्की. परंतु या राशीच्या लोकांनी आपला प्रामाणिकपणा सोडू नये. त्याचबरोबर कष्टाळू वृत्ती ही सोडू नये. कारण तेच त्यांच्या यशाचं रहस्य असतं. उशिरा का होईना पण या राशीच्या लोकांना यश मिळतं. 

फक्त सुरुवातीच्या काळामध्ये मात्र यांना भरपूर खडतर प्रवास करावा लागतो. उत्तर वयामध्ये यांना सुखाचे दिवस येतात असं म्हणायला हरकत नाही. मकर राशीच्या लोकांचा आणखीन एक चांगला गुण म्हणजे ही लोक महत्त्वाकांक्षी असतात. सतत प्रगती करण्याकडे यांचा कल असतो. 

एकदा यश मिळाल की आणखीन यश मिळवण्याकडे हे प्रयत्नशील असतात. आणि हाच गुण यांना पुढे घेऊन जातो मित्रांनो या माहीतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑगस्ट महिना मकर राशि साठी कसा असणार आहे. तर मकर राशीचे वर्णन आता केलं ते तुमच्याशी जुळत आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

या महिन्यात तुमचा स्वभाव थोडा उग्र राहू शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. एखाद्या सदस्यासोबत तुमचा जोरदार वादही होऊ शकतो. त्यामुळे कुणाशीही बोलताना विशेष काळजी घ्या. थोडा धीर ठेवा आणि इतरांना दुःखवणारे शब्द बोलू नका. 

पालकांचा आदर करा आणि त्यांचा प्रत्येक सल्ला काळजीपूर्वक ऐका. तुमच्या आईची तब्येत सूस्त होऊ शकते आणि त्यांचे मन हे अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे त्यांची पूर्ण काळजी घ्या. या महिन्यात तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला इतर क्षेत्रातून लाभही मिळतील. 

तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल. आणि या संदर्भात तुम्ही अनेक महत्त्वाच्या लोकांना भेटू शकता. सरकारी काम करणाऱ्यांना या महिन्यात कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आव्हानेही मिळतील. 

अशा वेळी तुमच्या बुद्धीने काम करा आणि कोणताही चुकीचा निर्णय घेणे टाळा. खासगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या कामात समाधानी दिसतील. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष कमी होईल. आणि त्यांचा वेळ निरुपयोगी कामात जाईल. त्यामुळे त्यांच्या परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. 

त्यामुळे तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मकर राशीच्या लोकांना एक सल्ला सुद्धा देण्यात येतोय तो असा की वरवर जी परिस्थिती तुम्हाला दिसते त्या पलीकडेही एक वेगळी परिस्थिती असते आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. 

वरवर दिसतय कुणीतरी सांगत आहे म्हणून तुमची मता बनवू नका. स्वतः त्या गोष्टीचा पडताळा घ्या आणि मगच आपले मत बनवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *