Skip to content

मधाचे हे १० फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आपण पाहणार आहोत मधाचे दहा घरगुती उपाय. मध एक अशी प्राकृतिक एंटीबायोटिक औषधी आहे. जी आपल्याला उत्तम स्वास्थ्य आणि सुंदरता प्राप्त करून देते. आज मी तुम्हाला मध पासून होणारे असे दहा फायदे सांगणार आहे. ते तुमच्या साठी खूप उपयुक्त ठरतील.

१) पोटासाठी- खूप लोकांची पोट साफ न होणे ही तक्रार असते. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्यावा. त्याशिवाय दररोज एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे मध मिक्स करून घेतल्याने पाचन शक्ती मजबूत होते.

२) एनर्जीसाठी- दररोज सकाळी पाण्यामध्ये मत मिक्स करून प्यायल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. जे आपल्याला दिवसभर उत्साही ठेवते.

३) चरबी कमी करण्यासाठी- आज काल खूप लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. या समस्येसाठी सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून घेतल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

४) मजबूत नखांसाठी यासाठी दूध आणि ओली होईल कोमट करून या मिश्रणामध्ये नखे काही सेकंद बुडवून ठेवावीत. नंतर बाहेर काढून नखांचे मालिश करावी. यामुळे नखे मजबूत होतात.

५) पिंपल साठी- चेहऱ्यावरील पिंपल साठी मध हा अतिशय परिणामकारक उपाय आहे. याचा उपयोग आपण फेसपॅक म्हणून करू शकतो मधाचा पातळ लेयर चेहर्‍यावर लावावा. व अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

६) चेहऱ्यावरील तेज मध एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे. जे त्वचेचे तेज वाढते स्किन लाईटेनिंग साठी हे मधाचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस एक चमचा दूध आणि बदामाचे तेल याचे काही थेंब एकत्र करून हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. दहा ते पंधरा मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढण्यास मदत होते.

७) सुरकुत्या कमी करण्यासाठी म्हणून मधाचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात. एक चमचा मधामध्ये पपईचा गर आणि दूध मिक्स करून हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. व अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.

८) केस वाढीसाठी- केस वाढीसाठी ही मधाचा वापर केला जाऊ शकतो ऑलिव ऑइल कोमट करून त्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करून हे मिश्रण केसांना लावावे. आणि वीस मिनिटानंतर शाम्पू करावा. यामुळे केस वाढण्यास मदत होते. व केस तुटतात देखील नाहीत.

९) कोंड्याच्या समस्येसाठी- मधामध्ये थोडे पाणी मिक्स करून ते स्केलवर लावावे. आणि दोन तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने ही समस्या दूर होते.

१०) हाडांची मजबुती- हाडे मजबूत बनवण्यासाठी मदत खूपच लाभदायक आहे. दुधामध्ये मध मिसळून पिल्याने हाडे मजबूत होतात. नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव अवश्य शेअर करा भेटूया नवीन उपायांसह धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *