Skip to content

महाशिवरात्रीला राशीनुसार अशी पूजा करा, महादेव होतील प्रसन्न.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला महाशिवरात्री आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यंदा महाशिवरात्री अत्यंत दुर्मिळ योगायोग आणि शुभमुहूर्तावर साजरी होणार आहे. या दिवशी शनी, चंद्र आणि सूर्य हे ग्रह कुंभ राशीमध्ये एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार करीत आहे. ग्रहांची ही दुर्मिळ स्थिती विशेषण अनेक राशींसाठी कायदेशीर ठरणार आहे.

याशिवाय वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीत या दिवशी शषी योग आहे. दुसरीकडे मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीत हंस योग आणि मालव्य योग असतील. मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी हे योग सामान्य फलदायी राहील. यावर्षी अत्यंत दुर्मिळ योगायोग घडला आहे. ज्यामध्ये पूजा फुलदायी ठरेल.चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशींच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो. भगवान भोले ना त्यांना लालचंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्यास खूप पुण्य प्राप्त होते. पूजेच्या वेळी ‘नागेश्वराय नमः’या मंत्राचा उच्चार केल्यास भगवान शिव शंकर मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात.

२) वृषभ रास- वृषभ भगवान शिवाचे वाहन आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो. पांढरा रंग या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. यासोबतच एखादे संकट दूर करण्यासाठी तसेच अपेक्षित लाभ मिळण्यासाठी ‘शिव रुद्राष्टकांचे’ पठण करावे.

३) मिथुन रास – मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीचे लोक भगवान शंकराला बेलपत्र भाग अर्पण करू शकतात. यासोबतच ‘ओम नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जप करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

४) कर्क रास- कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ज्याला भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात. कर्क राशींच्या लोकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. ‘रुद्राष्टाध्यायचा पाठ’तुमच्या संकटांना नाश करण्यासाठी ठरू शकतो.

५) सिंह रास- सिंह राशींचा स्वामी सूर्या आहे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंह राशीच्या लोकांनी लाल फुल अर्पण करावे. यासोबतच शिवालयात भगवान श्री शिव चालीसाचे पठण करावे. ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

६) कन्या रास- कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो. कन्या राशींच्या लोकांनी शिव पूजेत शिवलिंगावर बेलपत्र, धोत्रा, भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे. यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

७) तुळ रास- शुक्र हा तूळ राशीचा स्वामी मानला जातो. शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. यासोबतच शिवाच्या सहस्त्रनामाचा जप करणे तुमच्या राशीनुसार शुभ आणि फलदायी मानले जाते.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. भोले भंडारीचे गुलाब पुष्प बेल पत्राच्या मुळाने पूजा करावी. या दिवशी रुद्राष्टक पठण केल्याने तुमच्या राशीनुसार शुभ फळ मिळेल.

९) धनु रास- गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो. त्यांना पिवळा रंग खूप आवडतो. धनु राशीच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. खीर प्रसाद म्हणून द्यावे. तुमच्यासाठी शिवाष्टकाचे पटन केल्याने दुःखाचा नाश होतो.

१०) मकर रास – मकर ही शनीची रास मानली जाते. धोत्रा, भांग, अष्टगंध इत्यादी साहित्याने भगवान शिवाजी पूजा केल्याने तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल. यासोबतच ‘पार्वती नाथाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

११) कुंभ रास- कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुंभ राशींच्या लोकांनी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा. यासोबतच धनलाभ मिळवण्यासाठी शिवाष्टकाचे पठण करावे. तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळू शकतात.

१२) मीन रास- मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृता, दही,दुध आणि पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्या वाढवण्यासाठी पंच अक्षरी मंत्र ‘ओम नमः शिवाय’या मंत्राचा १०८ वेळा चंदनाच्या माळेने जप करावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *