Skip to content

महिलांनी रोज कराव्यात या गोष्टी लक्ष्मीची होते अखंड कृपा. या चुका तर अजिबात करू नका, नाहीतर लक्ष्मी होते नाराज.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरातल्या स्त्रियांनी देवपूजेसोबतच अशा कुठल्या गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे त्यांच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा अखंड राहील. आपण रोज देवपूजा करतो पण तरीसुद्धा घरात संकट येत राहतात. किंवा कुठल्या गोष्टीने कटकटी वाद-विवाद होत राहतात. मग आपल्या मनात विचार येतो की नक्की आपल काय चुकतय. 

कुठे आपण कमी पडतो आहोत. असं म्हणतात की घरच्या लक्ष्मीचा हात जिथे जिथे फिरतो तिथे तिथे माता लक्ष्मी वास करते. आणि म्हणूनच हा उपाय घरातल्या स्त्री वर्गाने महिला मंडळींनी करायचा आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे तो रोज स्वच्छ पुसून घ्यायचा. 

सकाळी उठल्यानंतर तुम्ही अंगण झाडत असाल तेव्हा आधी उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. कारण आपल्या दाराबाहेर जी नकारात्मक ऊर्जा असते ती दरवाजा उघडल्यानंतर आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडण्याआधी सुद्धा पहिला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर रोज आपण उंबरठ्यात रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकू सुद्धा अर्पण केलं पाहिजे. 

त्यानंतर आपले दोन्ही हात उंबरठ्यावर ठेवून आपल्या देवाला नेहमी एक प्रार्थना करायची आहेत. कारण देवाचा प्रवेश सुद्धा आपल्या घरात त्या उंबरठ्यावरूनच होत असतो. आणि म्हणून त्या उंबरठ्यावर हात ठेवून आपण प्रार्थना करायची आहे की जे चांगलं असेल तेच माझ्या घरात प्रवेश करू दे वाईट गोष्टी त्या उंबरठ्या बाहेरच राहूदे. 

आणि माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती आणि समृद्धी तसेच समाधान असूदे. त्यानंतर आपण अंगण झाडून पुसून स्वच्छ केल्यानंतर स्नान वगैरे झाल्यावर देवपूजा करायची आहे. त्यानंतर देवपूजा झाल्यावर आणखीन एक महत्त्वाचं काम करायचंय. ते म्हणजे तुळशीला पाणी घाला. तुळशीला पाणी घालता घालता सूर्यालाही अर्घ्य अर्पण करा. 

अर्घ्य देणं म्हणजे सूर्यालाही पाणी अर्पण करणे सूर्य देवाला पाणी अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते. घरातल्या लोकांची प्रगती होते. त्यानंतर तुळशीला हळदीकुंकू व्हायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे. सकाळ संध्याकाळ तुळशीपाशी दिवा सुद्धा लावायचा. 

जर तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा तुळशीजवळ नक्की लावा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. आणखीन एक गोष्ट करायला हवी ती म्हणजे देवपूजा झाल्यानंतर गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावर सुद्धा हळदीकुंकू वाहून एक फुल ठेवायच. कारण आपण दिवसभर त्यावर आपलं अन्न शिजवत असतो.

म्हणूनच तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. आणि त्यासाठी त्या अन्नपूर्णा मातेसाठी तिथे सुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. विचारांमध्ये सकारात्मकता येते. आणि ती कृतीतून प्रकट होते. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *