Skip to content

मार्च २०२३ ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ. आता वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मार्च २०२३ हा महिना ६ राशींसाठी आनंदाचा जाणार आहे. कोणत्या आहेत त्या सहा राशी चला जाणून घेऊयात. मित्रांनो २७ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह मकर राशीतून कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहे. सध्याच्या घडीला कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह विराजमान आहेत.

बुधाच्या कुंभ प्रवेशानंतर शुभ राजयोग तयार होत आहे. बुधाच्या कुंभ प्रवेशानंतर या राशीमध्ये त्रिग्रही योग जुळून येत आहे. बुध, सूर्य आणि शनि या तीनही ग्रहांचा त्रिग्रही योग शुभ मानला जात आहे आणि म्हणूनच सहा राशींसाठी आनंदाचे असतील.

१) मेष रास- मेष राशींच्या व्यक्तींना त्रिग्रही बुधादित्य योग यशकारक ठरू शकतो. आर्थिक बाबतीत यश मिळते. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. या कालावधीमध्ये तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ खूप छान असणार आहे. व्यवसायासाठी विस्तार करण्यात यश मिळेल. न्यायालीन प्रकरणांमध्ये सुद्धा सकारात्मक वार्ता तुमच्या कानी पडेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा त्रिग्रही बुधादित्य योग चांगला ठरू शकेल. हाती घेतलेल काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. नोकरीच्या दृष्टीने तर हा काळ खूपच चांगला आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकल्प जे थांबले होते ते आता पुन्हा चालू होतील. भरपूर पैसे मिळू शकतील. कौटुंबक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात नफा बघायला मिळेल. अनेक चांगल्या संधी चालून येतील. कौटुंबिक जीवन या काळामध्ये आनंदाने भरलेले राहील.

३) मिथुन रास- मिथुन राशींच्या व्यक्तींना सुद्धा चांगलाच फायदा होणार आहे. नशीबाची पूर्ण साथ मिळणार आहे. सर्व मनोकामना पुरती होऊ शकेल. व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये पुढे नेण्यासाठी खूप चांगला काळ आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. मन प्रसन्न राहील.

४) तुळ रास- तुळ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायच झाल तर ती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल. स्वतःमध्ये सुधारणा करणे उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायी ठरू शकते. परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतील. जे काही प्रयत्न कराल त्यात नक्कीच यश मिळेल.

५) धनु रास- धनु राशीसाठी सुद्धा हा काय चांगला आहे. संवाद कौशल्य मजबूत होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही समजूतदारपणाने आणि आर्थिक क्षमतेने करिअरमध्ये चांगले परिणाम करू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. बढती मिळण्याचे योग आहेत. माध्यमांच्या संबंधित लोकांची सुद्धा हा काळ चांगला आहे.

६) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तीला त्रिग्रही बुधादित्या योग नक्कीच चांगला ठरेल. तुमचे मनोकामना पुरती होईल. आर्थिक बाबतीत प्रगती बघायला मिळेल. व्यवसायिकांना सुद्धा चांगली कमाई करता येईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि अधिकारी यांचे सहकारी आणि प्रोत्साह मिळेल. वागण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *